Bachchu Kadu's Statement: होय, मी गद्दारी केली; पण दिव्यांगासाठी!

Bachchu Kadu's Statement For the Disabled People: बच्चू कडू यांच्या उपस्थितीत येवाल येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात पुरस्कार वितरण झाले.
Bachhu Kadu
Bachhu KaduSarkarnama
Published on
Updated on

Yeola News: मला गद्दार (Rebel) म्हणताय? होय, मी गद्दारी केली ती केवळ दिव्यांगांसाठी. यामुळे देशातीलच नव्हे, तर जगातील पहिल्या अपंग- दिव्यांग मंत्रालयाची निर्मिती झाली. माझी गद्दारी जनतेसोबत नसून, दीव्यांग व शेतकरी हितासाठी (Farmers) आहे. असे प्रतिपादन प्रहार (Prahar) शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी मंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी केले. (Prahar organisation`s Bacchu kadu said state Government takes prime decision for handicappe)

Bachhu Kadu
Gautami Patil Lavani Show: भाजप आमदार शिवेंद्रराजेंच्या वाढदिवसानिमित्त चक्क गौतमी पाटीलच्या लावण्यांचा कार्यक्रम

पाटोदा येथे संघटनेतर्फे झालेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. शेतकरी बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळाव्यात श्री. कडू यांच्या मातोश्री स्व. इंदिराबाई कडू यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा पहिला राज्यस्तरीय प्रहाररत्न पुरस्कार येथील माजी सभापती प्रवीण गायकवाड यांना प्रदान करण्यात आला.

Bachhu Kadu
Sanjay Raut Meet Kharge : संजय राऊत-खर्गे होणार भेट : सावरकरांवरील मतभेदावर काढणार मार्ग?

श्री. कडू म्हणाले, राज्यात सत्तांतर झाले. त्यात मी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सहभागी झालो. त्यामुळे माझ्यावर सातत्याने टिका होत आहे. विरोधकांनी हा राजकीय मुद्दा केला आहे. मात्र मी त्याची फारसी परवा करीत नाही, कारण माझे समर्थक माझ्यासमवेत आहेत. मी जर बंडखोरी केली नसती तर दिव्यांगासह विविध घटकांसाठी आज जे निर्णय होत आहेत ते झाले असते का?, असा प्रश्न त्यांनी केला.

यावेळी शेतकरी, सर्वसामान्य व आदिवासी बांधवांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मेळाव्यात रक्तदान शिबिर, तसेच शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या बियाण्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी मधमाशी पालन प्रशिक्षणाची नाव नोंदणीही या वेळी करण्यात आली.

Bachhu Kadu
Ambadas Danve On Eknath Shinde: आता झाले ना नऊ महिने, `वाचू का` विचारणाऱ्या मुख्यमंत्र्यांना टोला..

संघटनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख दत्तू बोडके, जिल्हाप्रमुख शरद शिंदे, अरुण ठाकरे, उपजिल्हाप्रमुख गणेश निंबाळकर, प्रवीण गायकवाड आदी प्रमुख पाहुणे होते. तालुकाध्यक्ष हरिभाऊ महाजन यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा, अडचणी व केलेल्या आंदोलानाची माहिती दिली. दरसवाडी-डोंगरगाव कालवा, कांद्याचे भाव, पतसंस्थांमध्ये अडकलेल्या ठेवी याप्रश्‍नी लक्ष घालण्याची मागणीही त्यांनी केली.

किरण चरमळ यांनी प्रहाररत्न पुरस्काराच्या स्वरूपाबद्दल माहिती दिली. अल्पसंख्यांक समाजातील अडचणी अजहर शहा यांनी मांडल्या. निंबाळकर यांनी पालखेड कालवा व दरसवाडी धरणाची माहिती देऊन तालुक्यातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळवून द्या, केवळ श्रेय घेऊ नका असे आवाहन केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com