Chalisgaon APMC Election: दिग्गजांनी दंड थोपटल्याने बाजार समितीत चुरस!

Chalisgaon Bazar Samiti Election: महाविकास आघाडीने भाकरी फिरवली, उमेदवारांत ९० टक्के नवे चेहरे.
Unmesh Patil & Rajeev Deshmukh
Unmesh Patil & Rajeev DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

BJP & Mahavikas Aghadi News: बाजार समितीच्या या निवडणुकीत खरी लढत महाविकास आघाडी आणि भाजपमध्येच आहे. या पार्श्वभूमीवर चाळीसगाव बाजार समिती निवडणुकीत आरोपांच्या फैरी झडत आहेत. १८ जागांसाठी ४२ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत. या निवडणुकीत दिग्गजांनी दंड थोपटल्याने चुरस निर्माण झाली आहे. (All party leaders active in APMC election)

महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांनी मतदारांचा कल लक्षात घेऊन भाकरी फिरवली. त्यांनी ९० टक्के नवे चेहरे दिले आहे. भाजप (BJP) व शिंदे गटाने (Eknath Shinde) विद्यमान संचालकांना स्थान दिले. त्यात भाजपचेच वर्चस्व आहे.

Unmesh Patil & Rajeev Deshmukh
Pachora APMC Election: पाचोऱ्याच्या तिरंगी लढतीत नेत्यांकडून साम, दाम, दंड!

बाजार समितीची मुदत सप्टेंबर २०२० मध्ये संपल्यानंतर निवडणुका लागल्या नाहीत. त्यानंतर १८ फेब्रुवारी २०२१ पासून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेचे अशासकीय प्रशासक मंडळ कार्यान्वित झाले होते. गेल्या दोन वर्षांमधील राजकीय घडामोडी लक्षात घेता निवडणुका तब्बल दोन वर्षांनी जाहीर झाल्या.

सप्टेंबर २०१५ मध्ये बाजार समितीच्या सभापतिपदावरून भाजपमध्येच रस्सीखेच होती. त्या वेळी खासदार उन्मेष पाटील आमदार होते. त्यांनी मच्छिंद्र राठोड यांचे नाव सभापती पदासाठी सुचविले होते. मात्र रवींद्र पाटील (उंबरखेड) यांनी सुद्धा सभापतिपदासाठी अर्ज भरला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजीव देशमुख व व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रदीप देशमुख यांच्या नेतृत्वाखाली संचालकांनी पाटील यांना पाठिंबा दिला आणि ते सभापती झाले. शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख महेंद्र पाटील हे उपसभापती झाले होते.

Unmesh Patil & Rajeev Deshmukh
Shivsena News: ठाकरेंच्या सभेत गुलाबरावांचे हात दाखवून अवलक्षण?

विद्यमान संचालकांमध्ये सरदारसिंग पाटील (जामदा), बळवंतराव पाटील (मुदखेडे), बारीकराव वाघ (दहिवद), शोभाबाई पाटील (कळमडू), कल्याणराव पाटील (चिंचखेड), प्रकाश पाटील (आडगाव), शिरीषकुमार जगताप (पिंपळवाड निकुंभ), धर्मा काळे (सायगाव), जितेंद्र वाणी (चाळीसगाव), रावसाहेब चव्हाण आदी नवीन उमेदवारांनी या वेळी संधी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना (उद्धव ठाकरे गट) या समविचारी महाआघाडीच्या शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांमध्ये विद्यमान माजी संचालकांमध्ये प्रदीप देशमुख (चाळीसगाव), दिनेश पाटील (बोरखेडा), महेंद्र पाटील (काकडणे), रोहिदास पाटील (बहाळ) यांचा समावेश आहे. तर १४ नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. त्यामध्ये संजय पाटील (तलोंदे), राजेंद्र पाटील (माळशेवगे), अशोक पाटील (जामदा), सागर साळुंके(खेडगाव), राजेंद्र माळी (मांदुरणे), रत्नाबाई पाटील (वाकडी), चंद्रकला पाटील(देवळी), शेषराव अहिरराव(खेडी), संजीव राठोड (वलठाण), अनिल पाटील (बहाळ), अनिल चौधरी, अतुल चव्हाण, श्यामलाल तथा नाना कुमावत व रोशन जाधव (चाळीसगाव) आदींचा समावेश आहे. (Latest Political News)

Unmesh Patil & Rajeev Deshmukh
Bhusawal APMC Election: एकनाथ खडसे देणार भाजपच्या आमदार सावकारेंना शह!

दरम्यान, भाजप, शिवसेना (शिंदे गट), रिपाइं व समविचारी पक्षाच्या महायुतीच्या स्व. रामराव जिभाऊ शेतकरी सहकारी पॅनलच्या उमेदवारांमध्ये ९० टक्के उमेदवार भाजपच्या उमेदवारांना संधी मिळाली आहे. आणि आमदार मंगेश चव्हाण यांनी नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. त्यामध्ये कपिल पाटील (बहाळ), नवल पवार (दहिवद), प्रदीप पाटील (डोण), दगडू माळी (पोहरे), शैलेंद्रसिंग पाटील (शिदवाडी), रवींद्र पाटील (नांद्रे), वनिताबाई पाटील (कळमडू), हेमराज पाटील (ब्राह्मणशेवगे), राहुल पाटील (वाघडू ), प्रभाकर जाधव (चाळीसगाव), साहेबराव राठोड (तळोदे प्र.चा.), नीलेश वाणी, ज्ञानेश्वर चौधरी, प्रभाकर घुमरे (चाळीसगाव) यांचा समावेश आहे. विद्यमान माजी संचालक किशोर पाटील (करजगाव), अलकनंदा भवर (रहिपुरी), रवींद्र पाटील (उंबरखेड), मच्छिंद्र राठोड (वलठाण) यांचा समावेश आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com