Chandrashekhar Bavankule Politics: बावनकुळे यांची सारवासारव, " धस, मुंडे यांच्यात तडजोड झालीच नाही"

Chandrashekhar Bavankule; it was just discussion, not compromise in Suresh Dhus and Dhananjay Munde-महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या बाबत नवा दावा केला आहे.
Chandrashekhar Bavankule, Dhananjay Munde & Suresh Dhus
Chandrashekhar Bavankule, Dhananjay Munde & Suresh DhusSarkarnama
Published on
Updated on

Chandrashekhar Bavankule News: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घडवून आणली होती. त्याबाबतची माहिती देखील त्यांनीच सांगितली. त्यामुळे सुरेश धस यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

स्वतः महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीच काही दिवसांपूर्वी ही माहिती दिली होती. त्यांच्या माहितीमुळे एकच खळबळ उडाली सध्या राज्यभर चर्चेत असलेला बीडचा प्रश्न आणि त्यावरून मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधातील हवाच निघून जाते की काय? अशी स्थिती होती. या संदर्भात भाजप नेते बावनकुळे यांचा तो मुत्सद्दीपणा होता की, अन्य काही याची देखील चर्चा झाली.

Chandrashekhar Bavankule, Dhananjay Munde & Suresh Dhus
Uddhav Thackrey Politics: शिवसेनेचा इशारा, महायुतीने तो निर्णय न घेतल्यास राज्यातील जिल्हा बँका संकटात जाणार...

आता बावनकुळे यांनी या विषयात एक नवा खुलासा केला आहे. ते म्हणाले, आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यात जी काही चर्चा झाली. ती माझ्यासमोर झाली. चर्चेमध्ये तडजोड करण्याचा काहीही विषय नव्हता. किंबहुना आमदार धस आणि मंत्री मुंडे यांच्यात तडजोड झालेलीच नाही, असा दावा त्यांनी केला.

Chandrashekhar Bavankule, Dhananjay Munde & Suresh Dhus
Gulabrao Patil Politics: "एकनाथ शिंदेंचे ५० आमदार म्हणजे बाजीप्रभू देशपांडे यांचे मावळे"

माझ्या निवासस्थानी आमदार सुरेश धस आणि मंत्री मुंडे यांची जी काही बैठक झाली होती. तिला आता जवळपास २७ ते २८ दिवस झाले आहेत. त्यामुळे तो विषय देखील जुना झाला आहे. माझ्यासमोरच त्या दोघांची चर्चा झाली. त्यात सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांना फाशी झाली पाहिजे, हे दोघांचेही मत आहे.

ही माहिती देतानाच त्यांनी पुन्हा एकदा सध्या चर्चेत असलेल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, मंत्री मुंडे आणि आमदार धस यांच्यात मनभेद नाहीत. त्यांच्यात मतभेद आहेत. एकमेकांना भेटण्याची ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

एकंदरच बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या यामुळे गेली दोन महिने राज्यातील वातावरण तापले आहे. महायुतीचे घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष यामध्ये अडचणीत आला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील लक्ष्य करण्यात येत आहे. मात्र मुंडे यांच्या राजीनामेबाबत उपमुख्यमंत्री पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघांनीही कानावर हात ठेवले आहेत. या वातावरणातील हवा काढून घेणारे वक्तव्य प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी केले होते. त्यामुळे या विषयावरील गोंधळ आणखी वाढण्याचीच शक्यता दिसते आहे.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com