Ajit Pawar Politics : भुजबळांचे चिमटे, दादांनी हळूच फडणवीसांकडे पास केला चेंडू

Nashik Guardian Minister : नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आग्रही भूमिका घेतली आहे. सात आमदार असल्याने पालकमंत्रीपद मिळायला हवं असं भुजबळाचं म्हणणं आहे.
Chhagan Bhujbal, Devendra Fadanvis, Ajit Pawar
Chhagan Bhujbal, Devendra Fadanvis, Ajit Pawarsarkarnama
Published on
Updated on

Chhagan Bhujbal news : नाशिकच्या पालकमंत्रीपदावरुन सध्या भाजपचे मंत्री गिरीश महाजन व राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ या दोघांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे. स्वातंत्र्य दिनी नाशिकमध्ये ध्वजारोहण करण्याचा मान गिरीश महाजन यांना मिळाला. त्यामुळे गिरीश महाजन हेच नाशिकचे अघोषित पालकमंत्री असल्याची चर्चा झाली. त्याचवेळी भुजबळांनी गोंदिया येथे ध्वजारोहण करण्यास नकार दिला. आजवर मी नाशिकमध्ये ध्वजारोहण करत आलो आहे, आता ही काय करायचे ते नाशिकमध्येच करेल नाही तर नाही असं भुजबळांनी स्पष्ट केलं. त्यातून भुजबळ नाराज असल्याचं स्पष्ट झालं.

त्यानंतर काल भुजबळांनी अगदी स्पष्ट व उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे सात आमदार असल्याने पालकमंत्रीपद राष्ट्रवादीच्याच वाट्याला यायला हवं. रायगडमध्ये एक जागा असताना एवढी शक्ती आपण लावत आहोत, तर नाशिकमध्ये तर आपले सर्वांधिक सात आमदार आहेत तिथेही शक्ती लावा असा चिमटा भुजबळांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे व पक्षाध्यक्ष अजित पवार यांना काढला. मी दोघांशी याविषयावर बोलणार आहे, असही भुजबळांनी सांगितलं.

मात्र, भुजबळांनी काढलेल्या या चिमट्यांना अजित पवारांनी आपल्या शैलीत उत्तर दिलं. अजित पवार म्हणाले, राज्याच्या निर्मितीपासून कुणाला पालकमंत्री करायचे किंवा मंत्री करायचं हा निर्णय सर्वस्वी मुख्यमंत्र्यांच्या अधिकारात येतो. कुणाला कोणतं खातं द्यायचं तेही मुख्यमंत्रीच ठरवतात. मुख्यमंत्री पालकमंत्री नेमण्यासाठी सक्षम आहेत. त्यामुळे नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय देखील वेळ आल्यावर ते घेतील. पालकमंत्री नसल्याने त्या जिल्ह्यातील विकासाची कामे थांबलेली नाही. ध्वजारोहण करायचं होतं ते ही थांबलं नाही. त्यामुळे प्रत्येक जण आपले मत मांडत असतो. त्यांना तो अधिकार आहे ,असं भुजबळांना उद्देशून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

Chhagan Bhujbal, Devendra Fadanvis, Ajit Pawar
Gulabrao Patil : 'नवरा आता बायकोकडून पैसे मागतो', एकनाथ शिंदेंचं नाव घेत गुलाबरावाचं अजब विधान

दरम्यान धुळे येथील एका कार्यक्रमात बोलताना, गिरीश महाजन यांनी मी नाशिकमध्ये पालकमंत्री होतोय असं विधान केलं होतं. मात्र काही तासांत त्यावरुन त्यांनी युटर्न घेतला. मी असं म्हणालो नव्हतो. मी नाशिकच्या पालकमंत्रीपदावर कधीही दावा केला नाही. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो मला मान्य राहील असं गिरीश महाजन यांनी म्हटलं.

Chhagan Bhujbal, Devendra Fadanvis, Ajit Pawar
Ajit Pawar : अजित पवारांनी एकाच फटक्यात कॉंग्रेसला पाडलं मोठं खिंडार, बड्या नेत्याचा एनसीपीत प्रवेश

त्यात भुजबळांनीही आता पालकमंत्रीपदासाठी आग्रह धरला आहे. त्यामुळे नाशिकच्या पालकमंत्रीपदावरुन सुरु असलेला वाद अधिक चिघळत चालला आहे. त्यातही या विषयावर आपण सुनिल तटकरे व अजित पवार या दोघांशी बोलणार असं भुजबळांनी सांगितलं होतं. परंतु त्या आधीच अजित पवारांनी पालकमंत्रीपदाचा चेंडू हळूच मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात सरकावला आहे. त्यामुळे भुजबळांची कोंडी झाली आहे, ते आता फडणवीसांकडे धाव घेतात का ते पाहावे लागेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com