Raj Thackrey Politics: राज ठाकरेंना झालंय तरी काय...? तीन दिवसांचा दौरा अवघ्या एकाच दिवसांत गुंडाळला...!

Raj Thackrey; MMS should play useful role for city and citizen-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मोलाचा सल्ला दिला
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Raj Thackrey News: महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे तीन दिवसांच्या दौऱ्यावर नाशिकला आले होते. मात्र त्यांचा हा दौरा एका दिवसातच आटोपला. ते तातडीने मुंबईला परत गेले आहेत. आता ते संघटनात्मक स्तरावर मोठा निर्णय घेण्याच्या मनस्थितीत आहेत.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या दौऱ्यात नाशिकच्या विविध पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना राज ठाकरे यांच्या आश्वस्त करणाऱ्या चर्चेने या पक्षातील गळती थांबण्याची शक्यता आहे. संघटनात्मक स्थिती सुधारण्यासाठी ते आता नवे उपाय करणार आहेत.

Raj Thackeray
Ajit Pawar Politics: अजित दादा, नाशिकच्या शेतकऱ्यांना दिलेला 'वादा' विसरले काय?

राज ठाकरे यांनी मुंबईला जाण्याआधी मनसेचे सचिव सलीम शेख शहराध्यक्ष सुदाम कोंबडे आणि दिनकर पाटील या तीन पदाधिकाऱ्यांची जवळपास पाऊण तास चर्चा केली. मनसेचा दृष्टिकोन आणि उद्देश समाजाच्या उपयोगी पडणे आहे त्यासाठी पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले पाहिजे असे त्यांनी सांगितले.

Raj Thackeray
MIM Politics: आमदार मुफ्ती यांचे सोमय्यांना आव्हान, म्हणाले, हिम्मत असेल तर...

समाजाचा अथवा जनतेचा कोणताही प्रश्न असेल तर तो सोडविण्याची अपेक्षा त्यांना फक्त मनसे आणि राज ठाकरे यांच्याबाबतच वाटते. मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्याबाबत आदेश दिला आहे. त्याचा संदर्भ देत ठाकरे यांनी हा प्रश्न मनसेने हाती घेतला होता, याची आठवण करून दिली.

नाशिक शहरातील लोकांचे अनेक प्रश्न आहेत. विशेषता या शहरातील रस्त्यांवर प्रचंड खड्डे आहेत. प्रशासनाने यामध्ये सावळा गोंधळ करून ठेवला आहे. हा प्रश्न मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी हाती घेतला पाहिजे.

नाशिक शहरातील समस्या आणि लोकांचे प्रश्न सोडवता यावेत यासाठी पदाधिकाऱ्यांनी नियमितपणे कार्यालयात येऊन बसावे. जनतेची गाऱ्हाणी ऐकावीत. ते सोडविण्यासाठी काम करावे. असे केले तर मनसेला जनमानसात पुन्हा एकदा स्थान मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज ठाकरे यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रामबाण उपाय सुचविला आहे. आगामी निवडणुकीत मनसेला पोस्ट काहीतरी करून दाखवावे लागणार आहे. त्याची चिंता आणि काळजी राज ठाकरे यांच्या या दौऱ्यात जाणवली. यातूनच आता नाशिकच नव्हे तसं बंद राज्यातील पदाधिकाऱ्यांचे रचना बदलण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. त्यामुळे या दौऱ्यानंतर नाशिकचे मनसेचे पदाधिकारी किती सक्रिय होतात, याला महत्व प्राप्त झाले आहे.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com