Chhagan Bhujbal News: मध्य प्रदेशचे मंत्री विजय शहा यांनी भाजपच्या तिरंगा रॅली दरम्यान आक्षेपार्ह वक्तव्य केले. ऑपरेशन सिंदूर मधील कारवाईबाबत कर्नल सोफिया कुरेशी यांचे देशभर कौतुक होत आहे. अशात भाजप मंत्री शहा यांच्या वक्तव्याने देशभर संतापाची लाट आहे.
मध्य प्रदेश सरकार मधील भाजपचे मंत्री विजय शहा यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यावरून देशभर संताप उसळला आहे. विविध संघटना आणि राजकीय पक्षांनी भाजपच्या या मंत्राचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. सबंध देशभर त्याविरोधात प्रतिक्रीया उमटल्या आहेत.
याबाबत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनीही भाजपचे कान टोचले आहेत. करणार सोफिया या अत्यंत वरिष्ठ लष्करी अधिकारी आहेत. त्यांनी पाकिस्तान विरुद्ध मोहिमेत दिलेले योगदान अतुलनीय आहे. सबंध देशभर त्यासाठी त्यांचे कौतुक होत आहे.
अशा वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांबाबत मंत्री शहा यांनी जे वक्तव्य केले ते अत्यंत क्लेशकारक आहे. त्याबाबत उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेत हस्तक्षेप केला आहे. पुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे. मात्र त्यातही मंत्री शहा यांनी आपली आक्षेपार्ह भूमिका बदललेली नाही याचं अत्यंत वाईट वाटते.
भारताने ऑपरेशन सिंदूर नंतर कर्नल कुरेशी, व्योमिका सिंग आणि डीजीपीओ मिस्त्री यांच्यावर माध्यमांना माहिती देण्याची जबाबदारी दिली होती. यामध्ये भारताने दाखविलेला समन्वय आणि अधिकाऱ्यांची निवड यामुळे जगभर भारताची प्रतिमा आणि प्रतिष्ठा वाढेल असा संदेश गेला. देशाच्या संरक्षणासाठी महिला देखील सक्षमपणे पाकिस्तानला धडा शिकवू शकतात असा संदेश यातून देण्यात आला आहे. पाकिस्तान बाबत असे कुठेही घडलेले नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील अतिशय उत्कृष्ट काम केले आहे. मंत्री शहा यांचे वक्तव्य क्लेशकारक आणि अत्यंत संतापजनक आहे. पक्षाने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न का केला?. पक्षाने त्यांना तातडीने राजीनामा घेऊन हाकलून द्यायला पाहिजे होते. भाजपने ते का केले नाही? हे समजत नाही. या शब्दात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी भाजपचे कान टोचले आहेत.
पाकिस्तान विरुद्ध केलेल्या मोहिमेत कुठेही जातीभेद, धर्मभेद असा प्रकार नाही. भारत हा सर्वांना संधी देणारा आणि सर्वसमावेशक अशी प्रतिमा असलेला देश आहे. शहा यांनी केलेल्या वक्तव्याने सबंध देशाची ही प्रतिमा डागाळू शकते. याचे भान त्यांना असायला हवे होते, असेही भुजबळ म्हणाले.
------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.