Chhagan Bhujbal : भुजबळांना जिवे मारण्याची धमकी, पोलिसांनी सुरक्षा वाढवली

Chhagan Bhujbal Death Threat : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे...
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Nashik News : अन्न व औषध प्रशासन मंत्री छगन भुजबळ यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. नाशिकमध्ये भुजबळ फार्मवर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मंत्री छगन भुजबळ यांना जिवे मारण्याची धमकी आल्यानंतर पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे.

Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal News : ‘मी एकटा कसा मराठा आरक्षण रोखू शकेन’

मंत्री छगन भुजबळ यांना जिवे मारण्याची धमकी आल्यानंतर पोलिस सतर्क झाले आहेत. विशेष म्हणजे उद्या छगन भुजबळ यांचा वाढदिवस आहे. या पार्श्वभूमीवर भुजबळांना शुभेच्छा देण्यासाठी आणि अभीष्टचिंतन सोहळ्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाची कसून तपासणी केली जाणार आहे. तसंच शाईचा पेन, पावडर यासह आक्षेपार्ह वस्तू नेण्यास पोलिसांनी मनाई केली आहे.

जिवे मारण्याच्या धमकीवर भुजबळ म्हणाले...

'मला धमकीचे फोन आणि मेसेजेस येत आहेत. आणि एक-दोन नव्हे तर अनेक येताहेत. अनेकजण माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत. मला माहिती मी फोन उचलल्यानंतर मला चिडवणार आणि मी काहीतरी बोलणार म्हणून जवळपास १०० फोन आतापर्यंत ब्लॉक केले आहेत', असं छगन भुजबळ म्हणाले.

'५७-५८ वर्षे झाली, अशा अनेकदा धमक्या आल्या. अडचणी आल्या आणि हल्लेपण झाले. जनतेचे आशीर्वाद असतात, काम करत राहायचं', अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे. तुम्हाला जिवे मारण्याची धमकी आली आहे? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्याला उत्तर देत छगन भुजबळ बोलले.

भुजबळ-जरांगे पाटील यांच्यात वाद

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून छगन भुजबळ आणि मनोज जरांगे-पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मनोज जरांगे-पाटील यांची आज जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात जंगी सभा झाली. या सभेतही जरांगे-पाटील यांनी भुजबळांवर जोरदार टीका केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भुजबळांना समज द्या, अन्यथा आपल्या नादी लागल्यावर सोडणार नाही, असा इशाराही जरांगे-पाटील यांनी दिला.

Chhagan Bhujbal
Manoj Jarange Speech News : शिंदे समितीने काम थांबवावे, जरांगेंच्या मागणीने सरकारपुढे नवे संकट ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com