Chhagan Bhujbal : भुजबळांनी विषय काढला अन् CM फडणवीसांनी एका मिनिटात वादावर टाकला पडदा... नेमकं काय घडलं?

CM Devendra Fadnavis and Minister Chhagan Bhujbal : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नाशिक उप-परिसराचे नाव बदलण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचं भुजबळ आपल्या भाषणात म्हणाले, त्यावर फडणवीसांनी उत्तर दिलं अन् नामांतरावर पडदा पडला.
Devendra Fadnavis-Chhagan Bhujbal
Devendra Fadnavis-Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Nashik Politics : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नाशिक उप-परिसराचे नाव बदलण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे समजते. मात्र ज्यांनी शिक्षणासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचले त्यांचे नाव बदलण्यात येऊ नये. इतर विद्यापीठांना महापुरुषांची नावे देण्यात आली आहे.

फुले दांपत्याचे जे कार्यक्षेत्र होते. त्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला त्यांचे नाव द्यावे यासाठी मोठा संघर्ष करावा लागला आहे. त्यानंतर हे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे यात कुठलाही बदल केला जाऊ नये अशी मागणी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 28) शिवनई (ता. दिंडोरी) येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नाशिक उपकेंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मंत्री छगन भुजबळ बोलत होते. कार्यक्रम पत्रिकेत ऐनवेळी बदल करत मंत्री छगन भुजबळ यांनी मनोगत व्‍यक्‍त केले.

भुजबळ म्‍हणाले, की विद्यापीठाच्‍या नाशिक उपकेंद्राच्‍या नामांतराची चर्चा सुरू झाली आहे. मात्र कुणाचे नाव घुसविण्याची गरज नाही. आधीच पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यासाठी संघर्ष, मंत्रिमंडळ बैठकीत सभात्‍याग करावा लागला होता. ज्‍यांच्‍या नावांची चर्चा आहे, ते लोक निश्‍चित मोठे असतील. अन्‍य ठिकाणी त्‍यांचे नाव द्यावे. सावित्रीबाई फुले यांच्‍या नावाने कार्यरत विद्यापीठाच्‍या उपकेंद्राला अन्‍य कुणाचे नाव देणे उचित ठरणार नाही, अशी भूमिका त्‍यांनी मांडली.

दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी मनोगतात उल्‍लेख करताना उपकेंद्रास अन्‍य कुणाचेही नाव दिले जाणार नाही, असे आश्‍वस्‍त केल्‍याने वादावर एका मिनिटात पडदा पडला.

Devendra Fadnavis-Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal : CM फडणवीसांच्या उपस्थितीत गिरीश महाजनांचा करेक्ट कार्यक्रम! भुजबळांनी भरकार्यक्रमात खड्ड्यांवरून डिवचले

रॅंकिंग सुधारण्यावर भर द्यावा...

देशपातळीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा लौकिक आहे; परंतु अद्याप पुष्कळ मोठा रस्‍ता पार करायचा आहे. बदलत्‍या काळात जागतिक स्‍पर्धा निर्माण झाली आहे. त्‍यामुळे विद्यापीठाने रँकिंग सुधरविण्यावर भर द्यावा. अनेक प्रगत देशांमधील युनिकॉर्न कंपन्‍या विद्यापीठातून उभ्या राहिल्‍या आहेत. या धर्तीवर आपल्‍या मातीत युनिकॉर्न कसे उभे राहतील, यासाठी प्रयत्‍न करावेत, प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं.

Devendra Fadnavis-Chhagan Bhujbal
Girish Mahajan : भुजबळांचे भाषण होण्याआधीच महाजनांनी साधली संधी; एक वक्तव्य अन् सभागृहात पिकला हशा, नेमकं काय घडलं?

या वेळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, खासदार डॉ. शोभा बच्छाव, भास्कर भगरे, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्रकुलगुरू डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, व्‍यवस्‍थापन परिषद सदस्‍य राजेंद्र विखे-पाटील, सागर वैद्य आदी उपस्‍थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com