Chhagan Bhujbal News: ना शिकमधील रस्त्यांवरील खड्डांचा प्रश्न सत्ताधारी भाजपसाठी त्रासदायक ठरतो आहे. आता विरोधकांसह मित्रपक्ष देखील या प्रश्नावरून भाजपला डिवचत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिकच्या दौऱ्यातील कार्यक्रमात मंत्री छगन भुजबळ यांनी देखील संधी सोडली नाही, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचे कौतुक करताना या दौऱ्यामुळे तरी खड्डे दुरुस्त झाले असे म्हणत टोला लगावला. विशेष म्हणजे या वेळी पालकमंत्री गिरीश महाजन हे देखील व्यासपीठावर होते.
सिंहास्थ कुंभमेळ्याच्या विविध उपक्रमांच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शुक्रवारी नाशिकचा दौरा झाला. या कार्यक्रमात मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दरमहा नाशिकला येण्याचे आमंत्रण दिले. मात्र या आमंत्रण मागे वेगळाच ट्विस्ट होता. शहरवासीयांना त्रस्त करणाऱ्या रस्त्यावरील खड्डे हे त्याचे कारण ठरले.
मुख्यमंत्री महोदयांकडे हेलिकॉप्टर आणि विमानाने येण्याचा पर्याय उपलब्ध असतो परंतु बहुदा नाशिककरांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी ते रस्त्याने आले असावेत, त्यांच्या या दौऱ्यामुळे तरी शहरातील खड्ड्यांचा प्रश्न उपस्थित झाला. सर्व सरकारी यंत्रणा जाग्या झाल्या आणि त्यांनी खड्डे बुजवले, असे भुजबळ यांनी म्हटले.
भुजबळांचा हा टोमणा लगावला. त्यावेशी नाशिकचे पालकमंत्री म्हणून घोषणा झालेल्या कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन हे देखील व्यासपीठावर उपस्थित होते. गिरीश महाजन यांच्या उपस्थितीतच मुख्यमंत्र्यांना हा घरचा आहेर मिळाला. त्यामुळे उपस्थितांतही खसखस पिकली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राच्या इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी केले. यावेळी शहरातील रस्त्यांच्या खड्ड्यांकडे भुजबळ यांनी वेगळ्या मार्गाने मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. तसा हा प्रश्न वेगवेगळ्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांपर्यंत चर्चेत होताच. आता महायुतीच्या मंत्र्यांनीच मुख्यमंत्र्यांना घरचा आहेर दिला. त्यामुळे तो अधिक चर्चेचा विषय ठरला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.