Chhagan Bhujbal : ईडीचे ग्रहण सुटले, आता भुजबळांच्या मागे लागल्या अंजली दमानिया

Anjali Damania will challenge Bhujbal's acquittal in the High Court : महाराष्ट्र सदन घोटाळ्यात एसीबीनंतर आता ईडी विशेष न्यायालयानेही त्यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली आहे.
Chhagan Bhujbal,Anjali Damania
Chhagan Bhujbal,Anjali Damania Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची महाराष्ट्र सदन घोटाळ्यात एसीबीनंतर आता ईडीच्या केसमध्येही निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला असताना याप्रकरणात आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उडी घेतली आहे.

छगन भुजबळ यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकाम गैरव्यवहारप्रकरणी दोषमुक्त करण्यात आल्याच्या निर्णयाविरोधात आपण मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे ईडीचे ग्रहण सुटले अन् अंजली दमानिया मागे लागल्या असे भुजबळांच्या बाबतीत झालं आहे.

छगन भुजबळांविरुद्ध २०१४ ला मी जनहित याचिका दाखल केली होती. तेव्हापासून माझा लढा सुरू आहे. माझी याचिका भुजबळांच्या ११ गैरव्यवहारांसंदर्भात होती. त्यातील आतापर्यंत केवळ २ गुन्ह्यांमध्ये भुजबळांना दिलासा मिळाला आहे. परंतु, कलिना सेंट्रल लायब्ररीचं प्रकरण अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे भुजबळ पूर्णपणे दोषमुक्त झाल्याचा दावा खरा नाही, असे दमानिया यांनी म्हटले आहे.

Chhagan Bhujbal,Anjali Damania
Nashik Politics : नाशिकच्या निफाडमध्ये उपनगराध्यक्षावर जादूटोणा ; काळ्या बाहुल्या, लिंबू व धमकीच्या चिठ्ठ्या..

महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभाग(ACB) महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळ्यात मुख्य तक्रारदार होता. सक्तवसुली संचालनालय (ED) भुजबळ यांच्याविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणाचा तपास करत होते. त्यामुळे या दोषमुक्तीला विरोध करणे अपेक्षित होते. मात्र तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भुजबळांना वाचविले आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील तेच करत आहे. विरोधकांवर आधी आरोप करायचे, त्यांच्या मागे तपास यंत्रणा लावायच्या आणि पक्षात नाहीतर आघाडीत घ्यायचे, हे भाजपचे तंत्र आहे. फडणवीस भ्रष्टाचाऱ्यांना घेऊन पुढे जात आहेत, असा गंभीर आरोपही दमानिया यांनी केला.

Chhagan Bhujbal,Anjali Damania
Chhagan Bhujbal : निर्दोष असताना अडीच वर्ष भुजबळांना तुरुंगात काढावी लागली, 'माफी मागा'.. संजय राऊतांचा हल्लाबोल कुणावर?

भुजबळ यांच्या दोषमुक्तीविरोधात आपण उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकारपरिषदेत सांगितलं. देशाच्या सरन्यायाधीश न्यायवृंद तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील मी पत्र लिहिणार आहे. मी या निर्णयावर स्थगिती देण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयात करणार आहे. ACB ने अपील करणे अपेक्षित होते, मात्र हे सगळे एकाच माळेचे मणी आहेत असा हल्लाबोल दमानिया यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com