Kumbh Mela Controversy: छगन भुजबळ, एकनाथ शिंदे ॲक्टिव्ह; भाजपची कोंडी! कुंभमेळाव्याच्या नियोजनावरून वाद पेटणार!

Kumbh Mela 2025 Planning Dispute: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकास कामांच्या लोण्यावर भाजपने एकट्यानेच अधिकार गाजवण्याचा प्रयत्न केला. तो आता त्यांच्या अंगलट येण्याची चिन्हे आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री छगन भुजबळ यांनी आता कुंभमेळ्यात थेट उडी घेतली आहे.
Devendra Fadanvis, Eknath Shinde & Chhagan Bhujbal
Devendra Fadanvis, Eknath Shinde & Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Chhagan Bhujbal Eknath Shinde Kumbh Mela BJP Controversy: सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नियोजन, विकास कामांचा आराखडा शासकीय स्तरावरील कामकाजाच्या जबाबदाऱ्या या सगळ्यांमध्ये भाजपने सुरुवातीपासून अन्य कोणालाही विश्वासात घेतले नाही.

यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी बैठका घेतल्या. बैठकांना विरोधी पक्षाच्या खासदारांना दूर ठेवले. एवढेच नव्हे तर महायुतीतील सहकारी पक्ष व जिल्ह्यातील स्थानिक मंत्री यांनाही या बैठकांचे निमंत्रण दिले नव्हते.

सिंहस्थ कुंभमेळ्यात बाबत प्रारंभी विरोधी पक्षाच्या खासदारांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली. आता त्यात सत्ताधारी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी देखील वादाचा नवा आखाडा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. याचाच एक भाग म्हणून अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी गुरुवारी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाबाबत स्वतंत्र बैठक बोलावली आहे. या बैठकीमुळे भाजपमध्ये अस्वस्थता आहे.

छगन भुजबळ यांनी बैठक बोलावली. मात्र, एकनाथ शिंदे यांची शिवसेना देखील स्वस्थ बसलेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या एकंदरीत सर्व कामांची माहिती मागविली आहे.

यापूर्वी देखील शिंदे यांच्याकडे असलेल्या नगर विकास विभागाकडून महापालिकेच्या गोदावरी स्वच्छता प्रकल्पांच्या निविदा आणि त्यातील तांत्रिक त्रुटी अधोरेखित करीत उपमुख्यमंत्र्यांनी त्यात अडथळे आणले होते.

Devendra Fadanvis, Eknath Shinde & Chhagan Bhujbal
BEST Election Results : "ठाकरेंना जागा दाखवली, ब्रँडच्या बॉसला..." बेस्ट निवडणुकीच्या निकालानंतर भाजपचा ठाकरे बंधुंवर पहिला वार

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी विविध यंत्रणांनी शासनाच्या आदेशानुसार नियोजन केले. 24 हजार कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. प्रत्यक्षात मात्र शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाला दोन हजार 270 कोटी रुपये मंजूर केले आहेत. सिंहस्थासाठी स्थापन केलेल्या प्राधिकरणाला देखील अवघे 1000 कोटी रुपये दिले जाणार आहेत. त्यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्याचा कितीही गाजावाजा होत असला तरी निधीच्या बाबतीत सगळ्यांचेच हात आखडले आहेत.

नव्या वादांमुळे कोंडी

राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे. अनेक यंत्रणांना विकास कामांसाठी निधी मिळालेला नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सर्व कंत्राटदार बिले मिळत नसल्याने रस्त्यावर उतरले आहेत. अशा स्थितीत सिंहस्थाची कामे देखील नाशिक बाहेरच्या तसेच गुजरातच्या कंत्राटदारांना देण्याचे प्रयत्न असल्याचा आरोप कंत्राटदारांनी केला आहे. त्यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्याला हा चौहूबाजुंनी नव्या वादांनी घेरण्याचे डावपेच सुरू झाले आहेत.

Devendra Fadanvis, Eknath Shinde & Chhagan Bhujbal
Balasaheb Thorat On Election : निवडणूक आयुक्तांवर महाभियोग? राजकीय 'स्टाइल', प्रेसचा 'ड्राफ्ट', राहुल गांधींना नोटीस अन् थोरातांचा 'बोचरा' सल्ला !

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com