BEST Election Results : "ठाकरेंना जागा दाखवली, ब्रँडच्या बॉसला..." बेस्ट निवडणुकीच्या निकालानंतर भाजपचा ठाकरे बंधुंवर पहिला वार

BJP's First Attack on Thackeray Brothers After BEST Election Results: मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच कोणत्यातरी निवडणुकीसाठी युती केल्यामुळे प्रतिष्ठेच्या झालेल्या दी बेस्ट एम्प्लॉईज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीचा निकाल समोर आला आहे.
Raj Thackeray And Uddhav Thackeray
BEST Election 2025 saw a major setback for the Thackeray brothers as their alliance panel failed to secure a single seat, while BJP-backed groups dominated.Sarkarnama
Published on
Updated on

BEST Election 2025 Results : मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच कोणत्यातरी निवडणुकीसाठी युती केल्यामुळे प्रतिष्ठेच्या झालेल्या दी बेस्ट एम्प्लॉईज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीचा निकाल समोर आला आहे.

या निवडणुकीच्या निकालात ठाकरे बंधुंना मोठा धक्का बसला आहे. कारण मागील नऊ वर्षांपासून बेस्ट पतपेढीवर वर्चस्व असणाऱ्या ठाकरेंना या निडणुकीत साधं खातं देखील उघडता आलेलं नाही.

बेस्ट पतपेढीच्या एकूण 21 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत शशांक राव पॅनेलने सर्वाधिक 14 जागा जिंकल्या. तर महायुती प्रणित सहकार समृद्धी पॅनेलने प्रसाद लाड, नितेश राणे आणि किरण पावसकर यांच्या नेतृत्वाखालील 7 जागांवर विजय मिळवला आहे.

Raj Thackeray And Uddhav Thackeray
School Closed : पावसाचा जोर कायम, प्रशासनाकडून 'रेड अलर्ट', 'या' जिल्ह्यातील शाळा बंद, पुणे शहरासाठी काय निर्णय?

मात्र, या निवडणुकीत मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या संयुक्त उत्कर्ष पॅनेलला एकाही जागेवर विजय मिळवता आलेला नाही. याच निकालातून आता भाजपने ठाकरेंना डिवचलं आहे. भाजप नेते प्रसाद लाड यांनी या निकालानंतर ठाकरेंना जागा दाखवली, ठाकरे ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकू शकले नाहीत, अशा शब्दात लाड यांनी ठाकरे बंधुंवर टीका केली आहे.

Raj Thackeray And Uddhav Thackeray
Dadar Kabutarkhana : दादर कबुतरखान्यावरील ताडपत्री काढणं जैन आंदोलकांच्या अंगलट, पालिकेच्या तक्रारीची वाट न पाहता अखेर पोलिसांची मोठी कारवाई

दरम्यान, बेस्ट पतपेढीची निवडणूक ही ठाकरे बंधूंच्या युतीची लिटमस टेस्ट असल्याचं मानलं जात होतं. या निवडणुकीनंतर महापालिका निवडणुकीत युती करायची की नाही याचा निर्णय घेतला जाणार असल्याचं बोललं जात होतं.

मात्र, आता या निवडणुकीत ठाकरेंच्या वाट्याला भोपळा आल्यामुळे आगामी निवडणुकीत ठाकरे युती करणार का? आणि केल्यास त्याचा किती परिणाम होणार? याबाबतच्या चर्चांना सुरूवात झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com