Chhagan Bhujbal : छगन भुजबळांच्या निधनाची खोटी बातमी व्हायरल करणाऱ्या युट्यूब चॅनलला दणका, पोलिसांची कारवाई

Maharashtra police file FIR against YouTube channel for spreading fake news about Chhagan Bhujbal’s death. YouTube video misused media branding : अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची खोटी बातमी एका बनावट व्हिडिओद्वारे सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली होती.
Chhagan Bhujbal 1
Chhagan Bhujbal 1sarkarnama
Published on
Updated on

Chhagan Bhujbal : अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची खोटी बातमी एका बनावट व्हिडिओद्वारे सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली होती. ही बनावट पोस्ट सुमारे सव्वा लाख लोकांपर्यंत पोहोचल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. ही पोस्ट व्हायरल करणाऱ्या संबधित युट्युब चॅनलला पोलिसांनी दणका दिला असून चॅनलविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या व्हिडिओमध्ये एका नामांकित टीव्ही चॅनलचा बनावट लोगो वापरण्यात आला होता. त्यामुळे अनेकांचा संभ्रम उडाला. यासंदर्भात नाशिक शहर आयुक्तालयाच्या विशेष शाखेचे अंमलदार सुनील बहारवाल यांनी शहर सायबर पोलिसांत फिर्याद दिली. त्यावरुन भुजबळ यांच्या निधनाची खोटी बातमी व्हायरल करणाऱ्या "हेल्पलाईन किसान" या डिस्प्ले नावाने सुरू असलेल्या @Nana127tv या युट्युब चॅनेलविरोधात शहर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

विशेष शाखेकडून सोशल मीडियावर सातत्याने नजर ठेवण्यात येते. ऑनलाईन सर्फिंग करताना, एका वृत्तवाहिनीचा लोगो वापरून “मंत्री छगन भुजबळ यांचे हृदयविकाराने निधन” असा भ्रामक मथळा असलेली एक व्हिडिओ लिंक आढळली. ती लिंक तपासण्यात आली असता, प्रत्यक्षात ती श्रीमती रंजनीताई बोरस्ते यांच्या निधनाची माहिती देणारी असल्याचे स्पष्ट झाले. ज्यामध्ये मंत्री छगन भुजबळ यांनी युट्युबवर श्रीमती रंजनीताई बोरस्ते यांना श्रद्धांजली अर्पण केली होती.

Chhagan Bhujbal 1
Nashik Kumbh Mela : कुंभमेळ्यासाठी सरकारकडून 'कच्चे नियोजन', 1 हजार कोटींच्या निधीवरुन उडाला गोंधळ

या बनावट पोस्टमुळे नाशिकसह महाराष्ट्रात खळबळ उडाली. ही बनावट पोस्ट सुमारे सव्वा लाख लोकांनी बघितली. त्यामुळे संभ्रम निर्माण होऊन अफवा पसरण्याची आणि जनक्षोभ उसळण्याची शक्यता होती. यामुळे शहराच्या शांततेला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. ज्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत या यूट्युब चॅनलवर गुन्हा दाखल केला आहे.

Chhagan Bhujbal 1
Rohini Khadse on Chitra Wagh : बस कर पगली...चित्रा वाघ यांच्या कवितेला रोहिणी खडसेंचे कवितेनेच उत्तर

सध्या सोशल मीडियाचा जनमाणसावर इतका परिणाम झाला आहे की, त्याच्यावर दाखवण्यात येणाऱ्या अनेक गोष्टीवर माणूस सहज विश्वास ठेवतो. संशयिताने मुद्दाम भुजबळ यांच्या निधनाची खोटी टॅगलाईन वापरून ही पोस्ट व्हायरल केली होती. एका मंत्र्यांच्या निधनाची खोटी बातमी हा एक गंभीर प्रकार आहे. पोलिसांनी तातडीने त्यावर अॅक्शन घेतली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com