Rohini Khadse on Chitra Wagh : बस कर पगली...चित्रा वाघ यांच्या कवितेला रोहिणी खडसेंचे कवितेनेच उत्तर

BJP leader Chitra Wagh targeted Uddhav Thackeray with a satirical poem. NCP leader Rohini Khadse responded with a counter poem, sparking social media buzz. चित्रा वाघ यांच्या कवितेवर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून उत्तर येण्याआधी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी कवितेच्या स्वरुपातच प्रत्युत्तर दिलं आहे.
Chitra Wagh Rohini Khadse
Chitra Wagh Rohini KhadseSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra politics : विरोधाला विरोध म्हणजेच उबाठा, अर्थशुन्य बडबड आणि नुसताच बोभाटा, बेगडी यांचे हिंदुत्व आणि बेगडी यांचे भाषा प्रेम, सामनात छापला इंग्रजीत मथळा करुन ठेवा फ्रेम, विसरुन जातात सारे काही दिल्या कितीही स्मरण गोळ्या, कधी काढले फोटो आणि कुठे केल्या सह्या, कुठेच पुरावे नसतात नुसतच करतात ढोंग, अशांना कधीच जाग येत नसते जे घेतात झोपेचे सोंग ..ओळखा पाहू कोण? अशी कविता करत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर कविता केली आहे.

हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरुन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने व मनसेने सत्ताधारी पक्षाला चांगलच घरेलं. दोन्ही ठाकरे बंधूनी एकत्र येत हिंदी सक्तीला विरोध केल्याने सरकारला अखेर आपली भूमिका बदलावी लागली. सरकारने पहिलीपासून हिंदी सक्तीचा जीआर सरकारने रद्द करत असल्याची घोषणा केली. या सगळ्या घडामोडींवरुन भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर कवितेतून टीका केली. ही कविता त्यांनी एक्सवर पोस्टवर केली.

चित्रा वाघ यांच्या कवितेवर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून उत्तर येण्याआधी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी कवितेच्या स्वरुपातच प्रत्युत्तर दिलं आहे. कशासाठी आमदार व्हायचं असतं काय करू लागली..जनतेचे प्रश्न सोडून, कविता करू लागली..ऐकून कविता यांची जनता आता हसू लागली..इतकं भंपकपणा बरा नव्हे ! बस कर पगली... या भाषेत रोहिणी खडसे यांनी चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

Chitra Wagh Rohini Khadse
Kunal Patil : कुणाल पाटील भाजपात यावे ही 'देवा'ची इच्छा, पडद्यामागे काय घडलं?

रोहिणी खडसे यांनी यासंदर्भात एक्सपोस्ट केली आहे. चित्रा वाघ व रोहिणी खडसे दोघांच्याही कवितांवर नेटकऱ्यांच्या तुफान प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान उबाठा पक्षाकडून चित्रा वाघ यांच्या कवितेवर नेमकं काय प्रत्युत्तर येतं ये पाहावे लागणार आहे.

Chitra Wagh Rohini Khadse
Kunal Patil : थेट गांधी घराण्याशी कनेक्ट, काँग्रेससोबत घनिष्ठ संबंध…तरीही कुणाल पाटलांनी का धरली भाजपची वाट?

महायुतीचे सरकार स्थापन होण्याआधी मुख्यमंत्री पदावरुन एकनाथ शिंदे यांचे नाराजी नाट्य रंगले होते. त्यावरुन रोहिणी खडसे यांनी कविता केली होती. त्या कवितेचीही चर्चा सोशल मीडीयावर सुरु झाली आहे. रुसू बाई रुसू, कोपऱ्यात बसू, आमच्यासंगे बोला आता, ढिश्यू, ढिश्यू, ढिश्यू। आहा… ही ही… हो हो, आता तुमची गट्टी फू! अशी ती कविता होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com