Sharad Pawar Nashik Tour : जनतेशी हा विद्रोह आहे, हा एक रोष आहे. याच येवल्यात येवून भाषण केले होते. तेव्हा मतदान केले होते ते शरद पवारांच्या विचारांसाठी केले होते. विचाराच्या विरोधात गेला तर काय होते. हे महाराष्ट्र दाखवून देईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नाशिकमधली सभेत कोल्हे बोलत होते. यावेळी कोल्हे म्हणाले, बोटावर लावलेल्या शाहिला जर जुना लावला तर काय होते, ते महाराष्ट्र दाखवू देईल. आज कुरुक्षेत्रासारखी परिस्थीती आहे. ही लढाई नत्यांची नाही. ही लढाई निती आणि अनितीची आहे. ही लढाई धर्माची आणि अधर्माची आहे. हाच तो शकुनी मामा आहे, त्यांच्यामूळे महाभारत घडले.
हा शकुनीमामा कोण आहे. कमळाचे फुल की टरबूज असा सवाल अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी केला. वारंवार पक्ष फोडले जात आहेत. वारंवार आमदार पळवले जात आहेत. मोदी @9 कार्यक्रम सुरु झाले. मात्र, रोजगार मिळाला? शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला का? २०१४ मध्ये सांगितले १५ लाख मिळणार आणि नंतर सांगितले हा चुनावी जुमला होता.
देशात परिस्थिती काय आहे. सगळीकडूनच भाजपा (BJP) हद्दपार होऊ लागली आहे. उत्तर प्रदेशानंतर सर्वाधीक जागा महाराष्ट्रात आहे. म्हणून महाराष्ट्रात अशी भूमिका घेतली जात आहेत. भावा-भावात वाद होतात. भावा-भावात वाद लावणाऱ्यांना सोडायचे नसते, असा हल्लाबोल कोल्हे यांनी केला.
विकासासाठी गेलो म्हणतात, मग या विकासाने महागाई कमी होणार आहे का? काद्यांला भाव मिळणार आहे का? या प्रश्नाची उत्तर मिळणार का? राज्यात नवीन देवस्थान निर्माण झाले आहे, त्या देवस्थानचे नाव 'इडी' आहे म्हणतात. हा महाराष्ट्रा खंडोजी खोपडेंचा नाही तर कानोजी राजे देशमुख यांचा आहे.
पोराला मुलासारखा जिव लावला. त्याला हवे ते दिले मात्र, एक दिवस पोराने घरावर हक्क सांगितला आणि घराबाहेर काढले. घराबाहेर काढणाऱ्यांना, महाराष्ट्र कधीही स्विकारणार नाही. 'ये तो सिर्फ ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है!' जेव्हा, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), काँग्रेस (Congress) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा त्रिशूल छाताडात घुसेल तेव्हा कळेल, असा इशारा कोल्हे यांनी दिला. जेव्हा बाप लढायला उतरतो तेव्हा लेकाचे काम असते खांद्याला खांदा देऊन साथ देण्याचे, असेही कोल्हे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.