Chhagan Bhujbal News: छगन भुजबळ समर्थकांनी घेतला राष्ट्रवादी भवनचा ताबा!

Leaders at NCP office in Nashik: राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष नॉट रिचेबल झाल्याने चर्चा
Flex & leaders at NCP office in Nashik
Flex & leaders at NCP office in Nashik Sarkarnama
Published on
Updated on

NCP Nashik News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर राज्यभर त्याचे पडसाद उमटत आहेत. नाशिकमध्ये सुरवातीपासून या पक्षाची सर्व सुत्रे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे होती. त्यामुळे बहुसंख्य पदाधिकारी त्यांचेच समर्थक आहेत. त्यांनी काल सायंकाळी राष्ट्रवादी भवनचा ताबा घेऊन कारभार सुरु केला. (Chhagan Bhujbal supporters took over NCP Bhavan of Nashik)

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी रविवारी बंडखोरी करीत आपणच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) असल्याचा दावा केला. त्यानंतर अपेक्षित कोणतिही प्रतिक्रीया नाशिकमध्ये (Nashik) उमटली नाही. शहराध्यक्ष रंजन ठाकरे आणि जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांनी फोन बंद करीत नॉच रिचेबल झाले होते. आज श्री. पगार भुजबळ समर्थकांसह पक्ष कार्यालयात दिसले.

Flex & leaders at NCP office in Nashik
NCP Crisis Nashik : शरद पवारांचे सर्व ६ आमदार गेले अजित पवारांबरोबर!

छगन भुजबळ यांनी अजित पवार यांच्यासमवेत मंत्रीपदाची शपथ घेत एकनाथ शिंदे, भाजप सरकारला पाठींबा दिला. त्याचे पडसाद राज्यभर उमटले. अनेकांना भुजबळ यांची हा निर्णय अनपेक्षीत वाटला. मात्र त्यांच्या समर्थकांनी त्याचे स्वागत केले आहे.

शहरात सोमवारी समाधान जेजुरकर यांनी `सदैव आमचे दैवत` असा मजकुर आणि मंत्री छगन भुजबळ यांचे छायाचित्र असलेले फ्लेक्स शहरभर लावले आहेत. त्यानंतर काल सायंकाळी हा फ्लेक्स राष्ट्रवादी भवन येथेही लावण्यात आला.

Flex & leaders at NCP office in Nashik
Eknath Khadse News: जळगावमध्ये एकनाथ खडसेच राष्ट्रवादीचा आश्वासक चेहरा?

आज दिलीप खैरै, अंबादास खैरे, कविता कर्डक, कर्डक, रंजन ठाकरे, रवींद्र पगार, यांसह समता परिषदेचे विविध कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी कार्यालयाच्या आवारात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने राष्ट्रवादी भवनला पोलीस छावनीचे स्वरूप आले होते. भुजबळ समर्थकांनी कार्यालयाचा ताबा घेतल्याने खळबळ उडाली आली. नागपूर येथील कार्यालयाचा ताबा भुजबळ समर्थक ईश्वर बाळबुधे यांनी घेतला होता.

दरम्यान याबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांने `सरकारनामा`ला सांगितले की, राष्ट्रवादी भवनमधून पक्षाचे सर्व कामकाज वरिष्ठ नेते म्हणून छगन भुजबळ पहात होते. मात्र हे कार्यालय राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट या संस्थेचे आहे. ती ट्रस्टची मालमत्ता असल्याने याबाबत श्री. भुजबळ यांच्याशी चर्चा केली जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com