Eknath Khadse News: जळगावमध्ये एकनाथ खडसेच राष्ट्रवादीचा आश्वासक चेहरा?

Jalgaon NCP News: अजित पवारांच्या बंडाने एकनाथ खडसेंचे वर्चस्व असलेल्या रावेर मतदारसंघात भाजपला दिलासा मिळाला.
Eknath Khadse
Eknath KhadseSarkarnama
Published on
Updated on

NCP Crisis Jalgaon : जळगाव जिल्ह्यात भाजपला आजवर आपली सर्व शक्ती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या विरोधात खर्च करावी लागत होती. अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार विरूद्ध अजित पवार अशी विभागणी झाली. त्यामुळे आगामी काळात जळगावच्या राजकारणात भाजपला आव्हान देणारा राष्ट्रवादी काँग्रेसचा आश्वासक चेहरा एकनाथ खडसे असतील. (What will Eknath Khadse take role in Political campaign of Loksabha)

रावेर (Jalgaon) लोकसभा मतदारसंघात एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या विरोधात रक्षा खडसे (Raksha Khadse) असे चित्र दिसते. भाजपने (BJP) रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी दिल्यास दोन शकले झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) प्रचारात एकनाथ खडसे आघाडीवर असतील.

Eknath Khadse
Rashtrawadi News: फांद्या कुठेही जावो आम्ही मूळ आणि खोड यांच्याशी नाते तोडणार नाही, कार्यकर्त्यांचा निर्धार...

अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील ताज्या बंडाने विधानसभा निवडणुकीतील राजकीय समीकरणे बदलणार असली तरी त्यापूर्वी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतही या बंडामुळे मोठीच उलथापालथ अपेक्षित आहे. रावेर लोकसभा क्षेत्रात भाजपच्या विद्यमान खासदार रक्षा खडसेंना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळते का? या प्रश्‍नावर अन्य पक्षांमधील उमेदवारांची नावे ठरणार आहेत. रावेर लोकसभा मतदारसंघावर कॉंग्रेस व राष्ट्रवादी अशा दोघांचा दावा असल्याने अजित पवारांच्या भूमिकेमुळे या क्षेत्रातील दिग्गज नेते एकनाथ खडसेंपुढे मोठे आव्हान असेल.

भाजपत तीन दशकांहून अधिक काळ मोठी पदे भूषविल्यानंतर पक्षात अन्याय होत असल्याचा दावा करत एकनाथ खडसेंनी दोन वर्षांपूर्वीच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले. मुळात, रावेर लोकसभा मतदारसंघ भाजपचा व अनेक वर्षे भाजपत असल्याने खडसेंच्या वर्चस्वाचे क्षेत्र राहिला आहे.

Eknath Khadse
Maharashtra Political Crisis : 'सिल्वर ओक'वर शरद पवार यांची कायदेतज्ज्ञांशी खलबतं? नव्या नियुक्त्यांमुळे पेच...

गेल्या दोन्ही वेळच्या लोकसभा निवडणुकीत रावेरमधून खडसेंच्या स्नुषा रक्षा खडसे मोठ्या फरकारने विजयी झाल्यात. सासरे राष्ट्रवादीत गेले तरी रक्षा खडसे भाजपतच राहिल्या आणि पक्षाच्या उपक्रमांमध्येही त्या सक्रिय आहेत. त्यामुळे पक्षाकडून सलग तिसऱ्यांदा उमेदवारी मिळण्याची त्यांना अपेक्षा आहे. तसे झाले तर खडसेंना सुनेविरोधात एकतर राष्ट्रवादीकडून अन्यथा मविआच्या जागावाटपात रावेर काँग्रेसकडे गेल्यास मविआकडून प्रचार करावा लागणार.

दुसरीकडे, या मतदारसंघावर कॉंग्रेससह राष्ट्रवादीचाही दावा आहे. गेल्या २०१९ च्या निवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार व माजी खासदार डॉ. उल्हास पाटलांनी रक्षा खडसेंविरोधात क्रमांक दोनची (३,१९,५८४) मते घेतली होती. शिवाय याच परंतु, पूर्वाश्रमीच्या जळगाव मतदारसंघातून डॉ. पाटील एकदा खासदारही झाले आहेत. त्यामुळे काँग्रेसचा या मतदारसंघावर दावा आहे. डॉ. उल्हास पाटील स्वत: नसले तरी त्यांच्या कन्या डॉ. केतकी पाटील या मतदारसंघात कमालीच्या सक्रिय झाल्या आहेत. निवडणूक लढवायची की नाही, याबाबत त्या बोलत नसल्या तरी त्याचे पावले त्या दिशेनेच पडत असल्याचे मानले जाते. अर्थात, त्यांनी अद्याप मतदारसंघातील भेटीगाठींसाठी कोणत्याही पक्षाचे व्यासपीठ अथवा माध्यम वापरलेले नाही. त्यामुळे कॉंग्रेससह अन्य पक्षांचे पर्याय उपलब्ध होत असतील तर डॉ. केतकी त्यांचे स्वागतच करतील.

Eknath Khadse
Darshana Pawar Killing Case : दर्शना पवार हत्या प्रकरणात मोठी अपटेड; राहुल हंडोरेची....

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत रावेरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसने लढवली होती. त्यावेळी रक्षा खडसेंविरोधात राष्ट्रवादीच्या मनीष जैन यांनी तब्बल २ लख ८७ हजारांवर मते घेतली होती. खडसेंनी त्यांना जवळपास साडेतीन लाखांहून अधिक मताधिक्याने हरविले होते. तरीही त्यावेळी राष्ट्रवादीने लढवलेली जागा म्हणून रावेर मतदारसंघावर या पक्षाचाही दावा आहेच. शिवाय, या वेळी तर राष्ट्रवादीत खडसेंसारखा वजनदार नेता असल्याने राष्ट्रवादीचा दावा अधिकच मजबूत होतो.

त्यांच्या स्नुषा रक्षा खडसेंना भाजपने उमेदवारी दिली नाहीच तर खडसे स्वत: सुनेच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादीत प्रतिष्ठा पणाला लावतील. रक्षा खडसेंना उमेदवारी नाकारली तर खडसे नावाच्या विरोधात भाजपला तगडा उमेदवार शोधावा लागेल. त्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश ऊर्फ राजूमामा भोळे, माजी आमदार स्व. हरिभाऊंचे चिरंजीव अमोल जावळे, जनार्दनहरीजी महाराज यांची नावे सध्या चर्चेत आहेत. शिवसेनेच्या ठाकरे व शिंदे गटाच्या शिलेदारांची तयारी या मतदारसंघात केवळ विधानसभा क्षेत्रापुरतीच मर्यादित दिसून येते. लोकसभा लढवायच्या दृष्टीने दोन्ही सेनांना उमेदवार शोधावे लागतील.

Eknath Khadse
Bhagatsingh Koshyari On Maharashtra Politics : राजकीय भूकंपावर माजी राज्यपाल कोश्यारींची प्रतिक्रिया, "जैसे ज्याचे कर्म तसै.."

खडसेंची जबाबदारी वाढणार

अजित पवारांच्या बंडामुळे रावेर मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसवर फार प्रभाव पडलेला दिसत नाही. कारण, या मतदारसंघात अजित पवारांपेक्षाही शरद पवारांना मानणारा पक्षातील वर्ग मोठा आहे. खडसे स्वत: पवारांसोबत असून जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील

साहेबांना सोडणार नाहीच. भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी, माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडेंची भूमिका यापेक्षा वेगळी नसेल. असे असले तरी या मतदारसंघातील ज्येष्ठ नेते म्हणून खडसेंची जबाबदारी वाढणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com