Chhagan Bhujbal OBC Melava : मंत्री भुजबळांचे फलक फाडले; ओबीसी एल्गार मेळाव्याआधीच नव्या वादाला तोंड फुटणार ?

Ahmednagar : नगरमध्ये तीन फेब्रुवारीला ओबीसी एल्गार मेळावा पार पडणार आहे.
Chhagan Bhujbal OBC Melava
Chhagan Bhujbal OBC MelavaSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News: मराठा कुणबी नोंदी असलेल्यांच्या 'सगेसोयरे' यांनाही कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची अधिसूचना सरकारने काढली. यानंतर ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. तीन फेब्रुवारीला नगरमध्ये ओबीसी एल्गार मेळावा पार पडणार आहे. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी जोरदार तयारी सुरू असून यासाठी नगर जिल्ह्यात वातावरण निर्मिती केली जात आहे.

यासाठी मेळाव्याचे फलक जागोजागी लावण्यात आले आहेत. पंरतु काही समाजकंटकांनी भुजबळ यांचे छायाचित्र असलेले फलक फाडले असल्याचे निदर्शनास आले आहे, त्यामुळे स्थानिक ओबीसी नेते आणि पदाधिकारी आक्रमक झाले असून ओबीसी एल्गार मेळाव्याआधीच नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. (Chhagan Bhujbal OBC Melava )

मराठा कुणबी नोंदीबाबत सरकारने काढलेल्या अधिसूचनेनंतर नगरमध्ये पहिला ओबीसींचा एल्गार मेळावा होत आहे. मंत्री भुजबळ यांच्यासह राज्यातील प्रमुख ओबीसी नेते या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. हा मेळावा यशस्वी होण्यासाठी तालुक्यातील गावनिहाय बैठका सुरू आहेत. मुंबईतील ओबीसी नेत्यांच्या बैठकीत देखील या एल्गार मेळाव्याच्या नियोजनाची दखल घेण्यात आली.

या बैठकीत ओबीसी नेते मंत्री भुजबळ यांनी काही सूचना केल्यानंतर स्थानिक ओबीसी समाजाचे नेते अॅक्टीव्ह मोडमध्ये आले आहेत. ओबीसींचा नगरमधील एल्गार मेळावा यशस्वी करण्यासाठी वातावरण निर्मिती केली जात आहे. स्थानिक पातळीवर कार्यकर्ते, पदाधिकारी यांना निरोप पोहोच केले जात आहे. कामाची विभागणी करून नियोजन केले जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Chhagan Bhujbal OBC Melava
Chhagan Bhujbal : छगन भुजबळांचा सरकारला इशारा; माझी भूमिका पटत नसेल तर बाहेर काढा

नगर जिल्ह्यात ओबीसींच्या एल्गार मेळाव्याच्या वातावरण निर्मितीसाठी स्थानिक नेत्यांना फलक लावण्याच्या सूचना केल्या गेल्या आहेत. त्यानुसार नगर शहरासह जिल्हाभर रस्त्याच्याकडेला फलक लागले गेले आहेत. काही गावांमध्ये देखील फलक लावले गेले आहेत.

नगर शहरातील फलकांमुळे चांगलीच वातावरण निर्मिती झाली आहे. या फलकांवर प्रमुख ओबीसी नेते म्हणून मंत्री छगन भुजबळांचे छायाचित्र आहे. याच छायाचित्रांना टार्गेट करून समाजकंटकांनी काही फलक फाडल्याचे समोर आले आहे. यावर ओबीसी समाजाचे स्थानिक नेते आणि पदाधिकारी आक्रमक झाले आहे.

यावर भाजपचे नगर शहर जिल्हाध्यक्ष तथा ओबीसी समाजाचे नेते अभय आगरकर म्हणाले, "मंत्री छगन भुजबळ यांचे छायाचित्र असलेले फलक काही समाजकंटकांनी फाडल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकाराची दखल घेतली असून, स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना निवेदन देण्याच्या सूचना केल्या आहेत", असं ते म्हणाले.

फलक फाडून फक्त समाजात दुही निर्माण होईल. हे नको आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या लढाईत ओबीसी समाज ठामपणे उभा राहिला आहे. पण ओबीसींचे हिसकावून देत असतील, तर ते कसे शक्य आहे. ओबीसींच्या आरक्षणाचे संरक्षण करण्यासाठी आम्ही ओबीसीचे नेते मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यामागे ठामपणे उभे आहोत. असे फलक फाडून चुकीचे काम करून समाजात दुही माजवणार्‍यांना प्रशासन नक्कीच शोधून काढेल आणि कारवाई करेल, यावर आमचा विश्वास आहे, असेही आगरकर म्हणाले.

(Edited By-Ganesh Thombare)

Chhagan Bhujbal OBC Melava
Ajit Pawar Kolhapur Tour : ‘मी, मुख्यमंत्री अन्‌ फडणवीस एकत्र बसून भुजबळांशी बोलणार’; भुजबळ तिघांचा सल्ला ऐकणार का?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com