राज्यातील सत्ताधाऱ्यांची महायुती आणि विरोधकांच्या महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा कायम आहे. पण, महाविकास आघाडीत सुरू असलेल्या जागावाटपाच्या पेचाला अशोक चव्हाण ( Ashok Chavan ) जबाबदार असल्याचा दावा काँग्रेसच्या ( Congress ) नेत्यांनी खासगीत बोलताना केला आहे. जागावाटपाच्या चर्चेत अशोक चव्हाणांची भूमिका महत्त्वाची होती. त्यामुळे पारंपरिक मतदारसंघाऐवजी अन्य मतदारसंघांवर दावा करण्यात आला. त्यामुळे भाजपत प्रवेश करण्यापूर्वी जाणीवपूर्वक हा घोळ चव्हाणांनी केला का? असा संशय काँग्रेस नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे.
महाविकास आघाडीतील ( Mahavikas Aghadi ) तीनही पक्षांमध्ये जागांवरून वाद निर्माण झाला आहे. शिवसेना ठाकरे गट ( Shivsena Thackeray Camp ) आणि राष्ट्रवादीनं काँग्रेसच्या ( Ncp Sharad Pawar ) काही पारंपरिक मतदारसंघावर दावा केला आहे. त्यात सांगली, भिवंडी, दक्षिण मध्य मुंबईसारख्या मतदारसंघांचा समावेश आहे, तर ठाकरे गटाकडील रामटेक, अमरावती आणि कोल्हापूर हे मतदारसंघ काँग्रेसच्या ( Congress ) वाट्याला गेले आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सांगली आणि दक्षिण मध्य मुंबईत ठाकरे गटानंतर भिवंडी मतदारसंघात राष्ट्रवादीनं आपला उमेदवार जाहीर केला आहे. त्यामुळे पक्षांतर करण्यापूर्वी अशोक चव्हाणांनी ( Ashok Chavan ) जाणीवपूर्वक हा घोळा करून ठेवल्याचा संशय काँग्रेसचे नेते व्यक्त करत आहेत. यावर भाजपचे खासदार अशोक चव्हाणांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
"काँग्रेसची केविलवाणी अवस्था"
एका वृत्तावाहिनीशी संवाद साधताना अशोक चव्हाण म्हणाले, "मी राजीनामा देऊन दीड महिन्याचा कालावधी झाला आहे. 12 फेब्रुवारीला मी राजीनामा दिला आहे. तेव्हा कुठंही जागावाटप अंतिम झालं नव्हतं. काँग्रेसच्या नेत्यांनी स्पष्टपणं भूमिका घ्यायला हवी होती. भिवंडीसारख्या महत्त्वाच्या जागेवर राष्ट्रवादी दावा करत आहे. मुंबईत काँग्रेसला एकच जागा मिळत आहे. काँग्रेसची केविलवाणी अवस्था झाली आहे."
"काँग्रेसचं नेतृत्व कमजोर"
"उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे काँग्रेसला जुमानत नाहीत. काँग्रेसचं नेतृत्व कमजोर झालं असून, त्यांना जागा राखता येत नाहीत. स्वत:च्या नाकर्तेपणाला समर्थन देण्याची हिंमत काँग्रेसमध्ये नाही. त्यामुळे दुसऱ्यावर थोपवण्याचा प्रयत्न आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपात माझा काहीही संबंध नाही," असं चव्हाणांनी स्पष्ट केलं.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.