Chhagan Bhujbal On BJP: मी बोलणारच...; विधानसभा जागावाटपावरून भुजबळांनी भाजप नेत्यांना घेतलं शिंगावर

Chhagan Bhujbal On Jitendra Awhad: एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात भाजपने राज्यभरात रान पेटवलं असतानाच भुजबळांनी आव्हाडांची पाठराखण केली होती.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Chhagan Bhujbal Politics: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मनुस्मृती आणि विधानसभा जागावाटपाच्या मुद्द्यावरुन टीका करणाऱ्या भाजप नेत्यांना चांगलंच सुनावलं आहे. तुम्ही काय समज द्या, समज द्या लावलंय, मी माझ्या पक्षात बोलणारच, असं म्हणत भुजबळांनी त्यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेणाऱ्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे मागील काही दिवसांपासून भाजपविरोधी भूमिका घेत असल्याचं दिसत आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याविरोधात भाजपने राज्यभरात रान पेटवलं असतानाच भुजबळांनी आव्हाडांची पाठराखण केली होती.

तर दुसरीकडे आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 80 ते 90 जागा मिळाल्या पाहिजेत. युतीत सहभागी होताना आम्हाला तसा शब्द देण्यात आला होता, असं वक्तव्य भुजबळ यांनी केलं. त्यांच्या याच वक्तव्यावर युतीतील मित्रपक्षांनी आक्षेप घेत नाराजी दर्शवली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवाय भुजबळांना आवरा, असंही भाजपच्या नेत्यांनी म्हटलं होतं. या सर्व नेत्यांच्या वक्तव्यावर आता भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे "काय समज द्या, समज द्या लावलंय, मी माझ्या पक्षात बोलणारच" अशा शब्दात त्यांनी टीका करणाऱ्यांवर निशाणा साधला. दरम्यान, भुजबळांनी जागावाटपा संदर्भात केलेल्या वक्तव्यावर भाजपने आक्षेप घेतला होता. त्याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले, मी जागावाटपाचा मुद्दा माझ्या पक्षांतर्गत बैठकीत मांडला होता.

Chhagan Bhujbal
Manoj Jarange Patil Arrest Warrant: ...म्हणून ही केस ओपन झाली का? कोर्टात हजर झालेल्या जरांगेंचा सरकारला सवाल

मात्र, लोकांना त्याचंही वाईट वाटलं. शिवाय भुजबळ असं कसं बोलू शकतात, अशी ओरड काही लोकांनी सुरु केली. त्यामुळे मी आता माध्यमांसमोर बोलणार नाही. मला जे काय सांगायचं असेल ते मी पक्षाला सांगेन. आम्ही महायुतीमध्ये येताना ते काय बोलले होते, त्याची आठवण फक्त मी त्यांना करुन दिली. पण त्यावर तुम्हीच चर्चा करता, भुजबळांना समज द्या, असं बोलता."

तुम्ही तुमच्या पक्षात बोलता तेव्हा आम्ही कुठं काय म्हणतो? तुमच्या पक्षात काय बोलावं हा जसा तुमचा अधिकार आहे. तसंच मी माझ्या पक्षात काय बोलावं हा माझा अधिकार असून ते सर्वांनी मान्य केलं पाहिजे. मात्र, शेवटी सर्व निर्णय चर्चेतून होणार, असंही भुजबळांनी सांगितलं. तर लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव होईल आणि राज्यात महायुतीच्या 45 जागा निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Chhagan Bhujbal
BJP Review Meeting : भाजप ‘त्या’ आमदारांच्या हाती कमळ नव्हे नारळ ठेवणार!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com