Manoj Jarange Patil Arrest Warrant: ...म्हणून ही केस ओपन झाली का? कोर्टात हजर झालेल्या जरांगेंचा सरकारला सवाल

Manoj Jarange Patil On Mahayuti: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आज पुणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर झाले होते. 2013 मधील एका गुन्ह्यात त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं होतं.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSarkarnama

Manoj Jarange Patil in Pune Court: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आज पुणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर झाले होते. 2013 मधील एका गुन्ह्यात त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं होतं. ते न्यायालयाने रद्द केलं. "मी न्यायालयाचा आदर करतो म्हणून आज कोर्टात आलो आहे. सरकारला काय सापडत नाही, म्हणून ही केस ओपन झाली की काय?" असं म्हणत जरांगे यांनी सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. (Manoj Jarange Patil Arrest Warrent)

तसंच जरांगे यांनी लोकसभेच्या (Lok Sabha) निवडणुकीदरम्यान मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) विरोध करणाऱ्यांना पाडा, या वक्तव्यावर देखील प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मी जातीवाद करत नाही, बीडमध्ये मी फक्त आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडा असं आव्हान केलं होतं. यावेळी त्यांनी मी कोणाचं नाव घेतलं नसल्याचा पुनरुच्चारही केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Manoj Jarange Patil
Ravindra Dhangekar On Hasan Mushrif : 'सत्तेसाठी शरद पवारांना सोडलं' धंगेकरांनी मुश्रीफांना डिवचलं

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर म्हणजेच 4 जूनपासून पुन्हा आमरण उपोषणाला बसणार असल्याचंही जरांगे पाटील यांनी जाहीर केलं. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं नाही तर विधानसभेला 288 जागांवर उमेदवार देणार असंही ते यावेळी म्हणाले.

जरांगे पाटील न्यायालयात का हजर झाले?

मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात 2013 मधील एका फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक वॉरंट जारी झालं होतं. म्हणून ते पुणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर झाले होते. यावेळी न्यायालयाने जरांगे पाटलांच्या विरोधातील वॉरंट रद्द करत त्यांना 500 रुपयाचा दंड ठोठावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com