Cash For Ministership : मंत्रिपदासाठी १०० कोटींची मागणी : भाजप आमदारांबरोबरच कॅबिनेट मंत्र्यालाही फसविण्याचा प्रयत्न

या प्रकरणी नुकतेच पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले असून या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी ७ आरोपींना अटक केली आहे.
100 crores for ministership
100 crores for ministershipSarkarnama

मुंबई : राज्यात सत्तांतराच्या नाट्यमय घडामोडीदरम्यान आमदारांना (MLA) मंत्रिपदासाठी (minister) फसवणाऱ्या आरोपींच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. यातील मुख्य आरोपी रियाज शेख याने एक, दोन आमदारांना नव्हे; तर कॅबिनेट मंत्र्यालाही आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात समोर आले आहे. विशेष म्हणजे संपर्क केलेले सर्व आमदार हे भाजपचे (BJP) आहेत. (Demand of 100 crores for ministership: Attempt to deceive BJP MLAs as well as cabinet ministers)

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपचे सरकार सत्तेवर आले. त्यानंतर मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारापूर्वी आमदारांना मंत्रिपद मिळवून देण्याच्या नावाखाली १०० कोटींची मागणी केली होती. मात्र, काही आमदारांना याबाबतची शंका आल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानंतर हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे पुढे आले होते.

100 crores for ministership
Sudhir Mungantiwar At Baramati : अब्दुल सत्तारांनी मंत्रिमंडळ बैठकीतच सांगितले अन तातडीने बारामती दौरा ठरविला : मुनगंटीवारांची स्पष्टोक्ती

दरम्यान, आरोपींनी ज्या आमदारांना फोन केले, ते सर्वच भाजपचे होते. विशेष म्हणजे आरोपींनी एका कॅबनेट मंत्र्यालाही संपर्क करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी नुकतेच पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले असून या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी ७ आरोपींना अटक केली आहे.

100 crores for ministership
Ajit Pawar News : सत्यजित तांबेंच्या शपथविधीवेळी ‘एकच वादा...अजितदादा’ घोषणा : पवारांनीच सांगितले कारण...

या आरोपींनी आपण दिल्लीतील भाजपच्या बड्या नेत्याच्या संपर्कात आहोत. मंत्रीपद मिळवून देतो, पण त्यासाठी १०० कोटी रुपये द्यावे लागतील, अशी मागणी तो आमदारांना करायचा. तशी मागणीही त्याने आमदारांकडे केली हेाती. रियाज शेख हा आमदारांना ‘आपण दिल्लीहून आलो आहोत, वरिष्ठ मंत्र्यांनी तुमचा बायोडाटा मागितला आहे,‘ अशी थाप तो भाजपच्या आमदारांना मारत होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com