Chhagan Bhujbal : भुजबळांनी घेतली नवी लढाई हाती.. कुणालाही अंगावर घ्यायला तयार..

Chhagan Bhujbal ST workers : एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या आणि प्रश्न मार्गी लावण्यासाठी आता अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे मैदानात उतरले आहेत. तसे वकिलपत्र आपण घेतल्याचे भुजबळ म्हणाले.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Chhagan Bhujbal : एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या आणि प्रश्न मार्गी लावण्यासाठी आता अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे मैदानात उतरले आहेत. गोरगरीब कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी आपण कुणालाही अंगावर घेण्यास तयार आहोत. आपल्या मागण्यांचे निवेदन स्विकारले आहे, आता वकिलपत्र घेतले आहे असं जाहीर करतो असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.

नाशिकमध्ये रविवारी सेवा शक्ती संघर्ष एस.टी कर्मचारी संघाच्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या मेळाव्यात छगन भुजबळ बोलत होते. भुजबळ म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या व अपेक्षा आहेत. त्यासाठी लढले पाहीजे. या लढ्यात आपण एसटी कर्मचारी संघटनेबरोबर आहोत. रडल्याशिवाय तर आई देखील दूध पाजत नाही. त्यामुळे लढणे आवश्यक आहे. आपल्या मागण्यांचे निवेदन हे आपले वकील म्हणून स्वीकारले आहे.

कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी व त्यांच्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी संघटनेचे पदाधिकारी, मंत्रिमंडळातील सहकारी यांच्यासमवेत मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पारपुरावा करणार असल्याची ग्वाही मंत्री भुजबळांनी दिली.

भुजबळ पुढे म्हणाले, आमदार गोपिचंद पडळकर व माजी मंत्री सदाभाऊ खोत हे दोन्ही नेते जिथे अन्याय होतो, त्याठिकाणी नेहमीच पुढे राहून काम करतात. त्यांच्या नेतृत्वात संघटना सेवाशक्ती संघर्ष करत आहे. एसटी कर्मचारी कामाच्या अत्यंत अवघड परिस्थितीतही, खडतर हवामानात, अपुऱ्या सोयींमध्ये ही सेवा अखंड सुरू ठेवण्याचे काम करत आहेत. या सर्वांचे योगदान अतिशय महत्वाचे आहे. एसटी कर्मचाऱ्यांना योग्य ते वेतन मिळालेच पाहिजे. यासाठी विधिमंडळात व मंत्रिमंडळातही बोलून प्रश्न मार्गी लावू असं भुजबळ म्हणाले.

Chhagan Bhujbal
BJP Politics : बागुल, राजवाडे आत.. आता भाजपने लावला हाउसफुल्लचा बोर्ड

एसटी म्हणजे एक लोकसेवा आहे. गोरगरिबांची सेवा करण्यासाठी ती महत्वाची वाहिनी आहे. जगातील कोणतीही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही फायद्यात नाही. त्यामुळे एसटी सेवा फायद्यात कधी येईल असे स्वप्न न बघता किंवा वाट पाहत बसता येणार नाही. जनतेच्या सेवेसाठी आवश्यक त्या तरतुदी एसटी साठी कराव्याच लागतील. वातानुकूलित व्यवस्थेत बसणाऱ्यांना या समस्या कळणार नाही असा टोला भुजबळांनी लगावला.

यावेळी आमदार तथा संघटनेचे कार्याध्यक्ष सदाभाऊ खोत म्हणाले, आम्ही कर्मचाऱ्यांच्या पाठिशी आहोत. सरकारही त्यांच्या मागण्यांबाबत सकारत्म आहे, परंतु वेळ पडली तर रस्त्यावरही उतरु असा इशारा खोत यांनी दिला. तर गोपिचंद पडळकर म्हणाले माझे व एसटीचे जवळचे नाते आहे. माझ्या यशामध्ये एसटीची साथ आहे. सरकार आठवा वेतन आयोग लागू करण्याच्या विचारात आहे. एसटी ला देखील आठव्या वेतन आयोगाच्या बरोबरीने वेतन द्यावे अशी मागणी पडळकर यांनी यावेळी केली.

Chhagan Bhujbal
Pune Rave Party : रेव्ह पार्टी प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय! खडसेंच्या जावयासह 7 जणांना पोलीस कोठडीत

यावेळी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असून त्या मार्गी काढणार असल्याचे गिरीश महाजन म्हणाले. यासंदर्भात दोन-चार दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बैठक घेऊन मागण्या मांडण्यात येणार आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशीही चर्चा झाली आहे. सर्वच देणे शक्य नाही परंतु जितके देता येईल तितकेच बोलणार आहे. असं महाजन यांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com