नाशिक : सिडकोतील प्रस्तावित उड्डाणपुलाचा वाद पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्याकडे पोहोचला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी याबाबत पोलकमंत्र्यांकडे तक्रार केली. त्यानंतर महापालिका आयुक्त कैलास जाधव यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे शहरात गेले काही दिवस शिवसेनेने (Shivsena) प्रतिष्ठेचा केलेला आणि भाजपचा (BJP) विरोध असलेला हा वादात आता पालकमंत्री छगन भुजबळ तोडगा काढतील.
मायको सर्कल व सिडकोतील त्रिमूर्ती चौकात उभारल्या जाणाऱ्या उड्डाणपुलाचा वाद रोज नवीन वळणे घेत आहे. सुरवातीला मायको सर्कल येथेच पूल उभारला जाणार होता. परंतु, नंतर त्रिमूर्ती चौकाचा समावेश करण्यात आला. अवघी ८५ कोटी रुपयांची तरतूद असताना अडीचशे कोटी रुपयांपर्यंत पुलाची किंमत वाढविण्यात आली. त्यानंतर निविदा निघाल्यानंतर सिमेंटची ग्रेड ४५ वरून ६० करण्यात आली. बदल करताना ठेकेदाराला पोषक धोरण स्वीकारले गेले. संरचना बदलत असताना नवीन निविदा काढणे गरजेचे होते, परंतु तसे न करता आहे त्या आराखड्यानुसारच पूल तयार करण्यास मान्यता दिली.
त्यानंतर भाजप नगरसेवक मुकेश शहाणे यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. नगरसेवकांचा पुलाच्या कामावरून संशय वाढताना ते आक्रमक भूमिका घेत आहेत. निविदा प्रक्रियेत दोन कंपन्यांनी सहभाग घेतल्यानंतर तिसऱ्यांदा निविदा काढणे अपेक्षित असताना घाईत निविदा प्रक्रिया गुंडाळण्यात आली. ट्रॅफिक सर्वेक्षण न करता उड्डाणपुलाचा प्रस्ताव तयार केला गेला.
यासारखे अनेक मुद्दे समोर आल्याने पुलाच्या कामातील अडथळे अद्यापही दूर होताना दिसत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी उड्डाणपुलाच्या निविदा प्रक्रियेवर संशय घेत पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे तक्रार केली होती. त्या अनुषंगाने महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी उचित कारवाई करण्याच्या सूचना पालकमंत्री भुजबळ यांनी दिल्या.
..
उड्डाणपुलाला विरोध नाही, परंतु पुलाचे काम देताना घोटाळा झाल्याचा संशय आहे. पालकमंत्री भुजबळ यांनी दखल घेताना कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दाद मागू. अनियमिततेच्या चौकशीची मागणी केली जाणार आहे.
- रंजन ठाकरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.
...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.