Yeola APMC : येवल्यात भुजबळांचाच करिष्मा...विजयाची हट्रिक बाजार समितीत भुजबळ यांच्या महाविकास आघाडी पॅनलची एकतर्फी सत्ता!

Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal Sarkarnama

Chhagan Bhujbal Wins in APMC : बाजार समितीच्या निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा करिष्मा कायम राहिल्याने विरोधी पॅनल निष्प्रभ ठरले. भुजबळांच्या पॅनलला १३ जागा मिळाल्याने एकतर्फी सत्ता कायम राहिली. मात्र त्यांच्या पॅनलने पाच जागा गमावल्या. प्रतिस्पर्धी शेतकरी समर्थक पॅनलला ३ व अपक्षांना २ जागा मिळाल्या. भुजबळांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीवरील सत्तेची हट्रिक पूर्ण झाली. (Chahgan Bhujbal`s influence still got impact in Yeola APMC)

भुजबळांसह माजी आमदार मारोतराव पवार,सहकार नेते अंबादास बनकर,माजी सभापती संभाजीराजे पवार यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनलने सक्षम उमेदवार देऊन पॅनलनिर्मिती केली होती. भुजबळांचे येथील निरीक्षक दिलीप खैरे यांनी पुढाकार घेऊन चांगल्या प्रकारे मोट बांधली होती.तर जेष्ठ नेते माणिकराव शिंदे यांनी शिवसेना जिल्हा प्रमुख कुणाल दराडे व भाजपला सोबत घेऊन पॅनलनिर्मिती केली होती.दुसऱ्या टप्प्यात आमदार नरेंद्र दराडे, आमदार किशोर दराडे हेही रिंगणात उरल्याने प्रचंड चुरशीच्या वातावरणात निवडणूक प्रकिया पार पडली. त्यामुळे जिल्ह्याचे निकालाकडे लक्ष लागले होते.

Chhagan Bhujbal
Nashik APMC : देविदास पिंगळे यांची शिवाजी चुंभळेंवर दणदणीत मात!

आज सकाळी ८ वाजता निरीक्षक तथा प्रांताधिकारी ज्योती कावरे, निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार आबा महाजन,सहाय्यक निवडणूक अधिकारी विजय बोरसे,निवासी नायब तहसीलदार पंकज मगर,बाळासाहेब हावळे यांच्या उपस्थितीत मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. हमाल मापारी व व्यापारी गट- उमेदवार अर्जुन ढमाले (१०४) अपक्ष तसेच शेतकरी विकास पॅनलचे व्यापारी गट- नंदकिशोर अट्टल (३०१ मते) विजयी झाले.

ग्रामपंचायत गटातील सर्वसाधारण दोन जागांवर शेतकरी समर्थक पॅनेलचे महेश काळे हे सर्वाधिक ५४१ मते घेऊन तर शेतकरी विकास पॅनेलचे अॅड. बापू गायकवाड हे ४३२ मते घेत विजयी झाले. ग्रामपंचायत गटाच्या आर्थिक दुर्बल जागेवर शेतकरी विकास पॅनेलचे उमेदवार पारेगावचे सरपंच सचिन आहेर यांनी ५५९ मते घेत विजय प्राप्त केला तर अनुसूचित जाती जमाती जागेवर शेतकरी संघटनेच्या संध्या पगारे यांनी ४२५ मते घेत विजय मिळवला.या गटात शेतकरी समर्थक पॅनेलचे गुड्डू जावळे यांचा ९७ मतांनी पराभव केला.सोसायटी गटातील महिला राखीव जागेवर शेतकरी समर्थक पॅनेलच्या उमेदवार माजी सभापती उषाताई शिंदे (६५६ मते) सर्वाधिक मते घेऊन तर शेतकरी विकास पॅनेलच्या लता गायकवाड (४९७ मते) विजयी झाल्या.

Chhagan Bhujbal
Dindori APMC : झिरवळांच्या मतदारसंघात झाला युवा नेतृत्वाचा उदय!

सोसायटी गटातील भटके विमुक्त जागेवर शेतकरी विकास पॅनेलचे उमेदवार कांतीलाल साळवे यांनी ५७५ मते घेत शेतकरी समर्थक पॅनेलचे उमेदवार नारायण आव्हाड (२५३) यांचा ३२२ मतांनी पराभव केला.सोसायटी गटातील इतर मागास प्रवर्ग गटात शेतकरी विकास पॅनेलचे वसंत पवार (५९६) यांनी शेतकरी समर्थक पॅनेलचे उमेदवार हरिभाऊ महाजन (३७३) यांचा २२३ मतांनी पराभव केला.सोसायटी गटाच्या सर्वसाधारण जागेवर शेतकरी विकास पॅनेलचे उमेदवार सविता पवार (७२६),संजय बनकर (७०५), रतन बोरणारे (६०९),किसन धनगे (५०१ ),अलकेश कासलीवाल (४९१) हे विजयी झाले तर शेतकरी समर्थक पॅनेलचे उमेदवार भास्कर कोंढरे (५३५) हे या गटात विजयी झाले.

शेतकरी विकास पॅनेलचे उमेदवार संजय पगार हे ४७१ मते मिळवत सर्वसाधारण सातव्या जागेवर विजयी झाल्याचे घोषित करण्यात आल्यानंतर याच पॅनेलचे दोन मतांनी पिछाडीवर असलेले उमेदवार मोहन शेलार यांनी पावणे दोन वाजता फेरमतमोजणीचा अर्ज केला.

Chhagan Bhujbal
Malegaon APMC : पालकमंत्री दादा भुसे यांना पराभवाचा धक्का; अद्वय हिरे जिंकले!

भुजबळांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनेलच्या विजयाचे श्रेय भुजबळासह माजी आमदार मारोतीराव पवार ,जेष्ठ नेते अंबादास बनकर,युवा नेते संभाजी पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, बाळासाहेब लोखंडे आदींना दिले जाते.यामुळे पॅनलला एकहाती सत्ता बाजार समितीवर प्राप्त करता आली.निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात चुरस निर्माण झाली होती मात्र ही चुरस निकालात दिसून आली नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com