Kolhapur News : थेट कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर का आली जप्तीची वेळ? काय आहे प्रकरण?

Kolhapur Colletior Office News : जिल्हाधिकारी कार्यालयातील खुर्च्या, लॅपटॉप, गाडी जप्त करण्याचे आदेश
Kolhapur News :
Kolhapur News :Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातून एक वेगळी माहिती समोर येत आहे. थेट कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावरच (Kolhapur Colletior Office News) जप्तीची वेळ आली आहे. कोल्हापूरातील कुरुंदवाड येथील जमिनी वादाबाबतच्या प्रकरणांकडे प्रशासनामार्फत दुर्लक्ष केले गेले. यामुळे आता न्यायालयानेच यासंदर्भात आदेश दिले आहेत.

Kolhapur News :
Marathwada Market Committee Election: मराठवाड्यातील १४ बाजार समित्यांची निवडणूक रद्द; खर्च भागवण्याची क्षमताच नाही..

१९८४ मध्येपासून याबाबतचा खटला सुरू होता. आता न्यायालयाकडून नुकसान भरपाईपोटी जिल्हाधिकारी कार्यालयावरच जप्तीचा आदेश काढले आहेत. थेट जिल्हाधिकारी कार्यालयावरच जप्तीचे आदेश आले, यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

याबाबतची अधिक माहिती अशी की, कोल्हापुरातील कुरुंदवाड येथील विकास आराखड्यासाठी संपादित झालेल्या जमिनीचा मोबदला मिळावा, यासाठीचा वाद प्रलंबित होता. यामध्ये कुरुंदवाड येथील वसंत संकपाळ यांची जमीन रस्त्याच्या विकासासाठी जिल्हा प्रशासनाने संपादित केली होती. मात्र जमिनीचे प्रशासनाने संपादन करून ही त्याबदल्यात मोबदला न मिळाल्याने, हा खटला १९८४ पासून सुरूच होता.

Kolhapur News :
Satara NCP : राष्ट्रवादी 'युवक'ने केला एप्रिल फूल दिनी मोदी सरकारच्या विकासाचा वाढदिवस

प्रशासनच्या वतीने वारंवार दुर्लक्ष झाल्याने याबाबत नुकसान भरपाई म्हणून थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर जप्तीचे आदेश काढण्यात आले. थेट कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावरच जप्तीची कारवाई राबवण्यासाठी अधिकारी आणि वकील दाखल आहेत. याबाबतीत न्यायालयानेच जिल्हाधिकारी कार्यालयातील खुर्च्या, लॅपटॉप, गाडी जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com