महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मंत्रालयात जायलाही घाबरतो?

नारायण राणे म्हणतात, कोणीही शिवसेनेचा कार्यकर्ता माझ्यासमोर उभा रहात नाही.
Narayan Rane
Narayan RaneSarkarnama

नाशिक : महाराष्ट्रात (Maharashtra) सध्या विकासाची नाही तर केवळ तोडफोडीची भाषा सुरु आहे. या सरकारमधील अनेक मंत्री जेलमध्ये जायच्या वाटेवर आहेत. या राज्याचा मुख्यमंत्री (Chief Minister Uddhav Thakrey) मंत्रालयात जायला घाबरतो, याला काय म्हणावे. येथे प्रगती, विकास, शिक्षण हे विषय चर्चेला देखील येत नाहीत, अशी टिका केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केली.

Narayan Rane
जळगावला राष्ट्रवादीने राज्यपालांचा एकदा नव्हे दोनदा निषेध केला!

महापालिकेतर्फे झालेल्या आयटी पार्क उभारणीबाबत झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांनी शहरातील आयटी कॅानक्लेव्ह २०२२ चे उदघाटन केले. यावेळी त्यांनी नाशिक शहरात आयटी पार्कची आवश्यकता आहे. त्याची उभारणी करण्याची आपील तयार आहे. त्यासाठी आडगाव शिवारात ३३५ एकर जागा उपलब्ध असून त्याची निश्चित केली जाईल असे सांगितले.

Narayan Rane
छगन भुजबळांच्या मतदारसंघात शिवसेनेने दिली नंबर एक होण्याची घोषणा!

ते म्हणाले, शहरात आयटी पार्कसाठी एक महिन्यापूर्वी प्रस्ताव आला होता. मात्र त्याबाबत शहरात जास्त राजकारण खेळलं जातंय. मात्र आपल्याला राजकारण खेळायचं नाही तर आयटी पार्क उभा करायचचा आहे. मला माहिती आहे, सध्याच्या स्थितीत अतिशय कष्टातून उद्योग उभा राहत आहे. शहर व समाज आत्मनिर्भर होण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. महापालिका आयुक्त पळून गेले. कार्यक्रमाला आले नाही. मी केंद्रीय मंत्री म्हणून कार्यक्रमात असतांना आयुक्तांनी यायलाच हवे होते.

श्री. राणे म्हणाले, भिवंडीत देखील ५०० एकर जागेत औद्योगिक परिसर उभा करण्याची परवानगी मागितली आहे. तसा प्रस्ताव नाशिकमधून आल्यास त्यालाही मान्यता देईन. उद्योग वाढला तर रोजगार वाढेल. देशाच्या जीडीपीला हातभार लागेल. मला मंत्री म्हणून माझ्याकडे मागू नका, तर हक्कानं कामे करायला सांगा, मी करतो.

यावेळी श्री. राणे यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्र्यांवर टिका करण्याची संधी सोडली नाही. ते म्हणाले, माझी राजकारणात वाटचाल ही बाळासाहेबांची कृपा आहे, हे मी आजही मान्य करतो. मला १९९१ पासून पोलिस संरक्षण आहे. मी कोणालाही घाबरत नाही. त्यामुळे आमच्यावर सातत्याने राजकीय हल्ले केले जातात. शिवसेनेच्या सत्ताधाऱ्यांची खुर्ची हलायला लागली आहे. मात्र घाबरू नका आम्ही आहोतच. भाजपसोबत युती करून शिवसेना निवडून आली. मात्र जेव्हा मुख्यमंत्रीपद भाजपला मिळतंय म्हणून त्यांनी गद्दारी केली.

ते पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप करायची त्यांची लायकी नाही. मात्र त्यांची पात्रता नाही. कारण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मंत्रालयात देखील जात नाही. मुंबईत मराठी माणसांची घरं गेली, तिथे झालेल्या इमारतीत ही मंडळी भागीदार आहेत. शरद पवार यांच्या मेहेरबानीने त्यांना अडीच वर्षे मुख्यमंत्री पद मिळाले आहे. महापालिकेल्या स्थायी समिती सभापतीकडे आतापर्यंतची गणती शंभर कोटीच्यावर पोहोचली आहे, हे बोलके आहे.

कोकणाला फसवले

श्री. राणे यांनी शिवसेनेच्या नेत्यांनी कोकणाला फसवले असा आरोप केला. ते म्हणाले, कोकणात नाणार भागातील सर्व जमिनी शिवसेना नेत्यांच्या आहेत. आता त्या जमिनी अणुऊर्जा प्रकल्पासाठी देतील आणि पैसे कमावतील. नुसत्या घोषणा देतात, त्यांच्यात काही दम नाही. मी उभा राहिलो आणी शेतकऱ्यांच्या बाजूनं मोजणी करून घेतली. जिथे तिथे मी जातो तीथे ते विरोध करतात. नाशिकला येणार म्हणून विरोध केला. मात्र एकही शिवसैनिक काही समोर येत नाही.

नाशिक महापालिका आणि क्रेडाई संस्थेने हा कार्यक्रम संयुक्तपणे आयोजित केला होता. यावेळी महापौर सतीश कुलकर्णी, माजी मंत्री जयकुमार रावल, आमदार देवयानी फरांदे, आमदार राहुल ढिकले, आमदार सीमा हिरे, राहुल ढिकले आदी उपस्थित होते. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाला स्थानिक भाजपच्या नेत्यांची लश्रणीय उपस्थिती होती. शहर तसेच विविध भागातील शंभराहून अधिक माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या प्रतिनिधींनी त्यात सहभागी झाल्याचा दावा संयोजकांनी केला.

निवडणूक आणि कार्यक्रम

महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांची मुदत संपुष्टात येत आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्याला राजकारण चिकटलेले होते. त्यामुळे या कार्यक्रमातही राजकारणाचा वास येत होता. त्यामुळे आयोजक असुनही महापालिका प्रशासनाची अनुपस्थिती जाणवली, विशेषतः महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी त्याकडे पाठ फिरवली होती.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com