Chimanrao Patil News : पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील शिवसेनेला सोडचिठ्ठी देत शिंदे गटाच्या सत्तेत सामील झाले. त्यावेळी त्यांना मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र तसे न झाल्याने त्यांचा हिरमोड झाला होता. आता मतदारसंघासाठी निधी मिळत असल्याचे राजकीय समाधान त्यांनी व्यक्त केले आहे. (Chimanrao Patil happy due to he got big funds for roads)
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे पारोळा (Jalgaon) येथील आमदार चिमणराव पाटील (Chimanrao Patil) यांच्या मतदारसंघातील रस्त्यांसाठी २८ कोटींचा निधी मिळाला. त्यामुळे हे शिवसेना (Shivsena) सोडल्याचे गिफ्ट मानले जात आहे.
जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात गुलाबराव पाटील आणि चिमणराव पाटील यांच्यातील राजकीय सख्य नेहेमीच चर्चेत असते. शिंदे गटात गेलेल्या चिमणराव पाटील यांना मंत्रीपद मिळेल असे वाटत होते. मात्र गुलाबराव पाटील यांनी बाजी मारली. त्यामुळे चिमणरावांची संधी गेली.
मतदारसंघातील गेल्या अनेक वर्षांपासुन खराब असलेल्या रस्त्यांमुळे रहदारी करणाऱ्या नागरीकांसह स्थानिक ग्रामस्थांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. रस्त्यांचा झालेल्या दुरावस्थेमुळे शिक्षण, आरोग्य, दळणवळण यांसारख्या समस्यांना दैनंदिन नागरीकांना सामोरे जावे लागत आहे. यामुळे नागरीकांची देखील मोठी गैरसोय होतांना दिसत होती,
रस्त्यांसह पुलांअभावी पावसाळ्यात गावांचा संपर्कच तुटत होता. त्यात प्रामुख्याने पारोळा तालुक्यातील लोणी सिम, लोणी बु, लोणी खु, मोंढाळे प्र.अ. व करमाड या गावांना पुलाची नितांत आवश्यकता भासवत होती. यासाठी आमदार चिमणराव पाटील हे सातत्याने पाठपुरावा पुरावा करित होते. या पाठपुराव्यानेच सद्या मुंबई येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी अर्थसंकल्प जुलै २०२३ अंतर्गत एकुण २८ कोटींच्या रस्त्यांचा व पुलांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. यामुळे रस्त्यांचा व पुलांच्या दुरावस्थेमुळे उद्भवणाऱ्या दैनंदिन समस्यांना पुर्णविराम लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.