Kunal Patil : कुणाल पाटील भाजपात यावे ही 'देवा'ची इच्छा, पडद्यामागे काय घडलं?

Devendra Fadnavis backed Kunal Patil's BJP entry : सत्तर वर्षांपासून काँग्रेस पक्ष व गांधी घराण्याशी एकनिष्ठ असलेल्या धुळ्यातील पाटील घराण्याचे कुणाल पाटील हे अखेर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.त्यामुळे धुळ्यात कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
Kunal Patil BJP
Kunal Patil BJPSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra politics update : सत्तर वर्षांपासून काँग्रेस पक्ष व गांधी घराण्याशी एकनिष्ठ असलेल्या धुळ्यातील पाटील घराण्याचे कुणाल पाटील हे अखेर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली असून मंगळवारी (ता.1) मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित त्यांचा प्रवेश सोहळा होणार आहे. त्यामुळे धुळ्यात कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

कुणाल पाटील यांचे वडील रोहिदास पाटील तब्बल 70 वर्ष कॉंग्रेससोबत होते. राजीव गांधी यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. गेल्याच वर्षी त्यांचे निधन झाले. त्यानंतर कुणाल पाटील यांनी हा निर्णय घेतला आहे. स्वत: कुणाल पाटील व राहुल गांधी यांचेही चांगले संबंध आहेत. मात्र आपल्या राजकीय भवितव्याचा विचार करुन त्यांनी कॉंग्रेस सोडण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातं. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव कोणताही शब्द, आश्वासन न घेता भाजपात जात असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून कुणाल पाटील हे सातत्याने भाजपच्या नेत्यांच्या संपर्कात होते. काही दिवसांपूर्वी पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या कार्यालयात त्यांची भेट घेऊन प्रदीर्घ चर्चा केली होती. तेव्हाच त्यांच्या पक्षप्रवेशाच्या प्रक्रियेला सुरुवात झाल्याचे सांगितले जाते. तसेच भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची त्यांनी भेट घेतली होती, त्या भेटीनंतर पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा महाराष्ट्रभर राजकीय वर्तुळात सुरु झाल्या.

Kunal Patil BJP
Kunal Patil : राहुल गांधीना धक्का, 700 कार्यकर्त्यांसह कुणाल पाटील भाजपमध्ये चालले ; प्रवेशाची तारीख ठरली..

मुळात कुणाल पाटील यांच्यासारखा नेता भाजपमध्ये यावा ही स्वत:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच इच्छा असल्याचं सांगितलं जात आहे. त्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून देवेंद्र फडणवीस स्वत:प्रयत्न करत असल्याचं बोललं जातं. 2014 ला विधानसभेची निवडणूक व 2024 ला लोकसभेच्या निवडणुकीवेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वत:मला भाजपात येण्याची ऑफर दिली होती असा दावा कुणाल पाटील यांनी केला आहे.

त्यामुळे कुणाल पाटील यांना भाजपात घेण्यासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पातळीवर हालचाली झाल्याचं बोललं जात आहे. कुणाल पाटील यांचा विधानसभेला पराभव झाला असला तरी त्यांचे राजकीय वलय मोठे आहे. जिल्ह्यातून कॉंग्रेसला पूर्णपणे हद्दपार करायचे असेल तर कुणाल पाटील यांना भाजपात घेणे गरजेचे असल्याचं भाजपला वाटलं. शिवाय पाटील यांच्यासारखं मोठं घराणं भाजपात आल्यास पक्षाला मोठा लाभ होईल. असे मनसुभे पूर्ण करण्यासाठी भाजपने पाटील यांना गळाला लावल्याचं बोललं जात आहे.

Kunal Patil BJP
Kunal Patil : थेट गांधी घराण्याशी कनेक्ट, काँग्रेससोबत घनिष्ठ संबंध…तरीही कुणाल पाटलांनी का धरली भाजपची वाट?

दहावर्षापूर्वीच पाटील यांना पक्षात घेण्यासाठी फडणवीस यांनी प्रयत्न केला होता अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यावेळी फडणवीस हेलिकॉप्टर ने धुळ्यात आले होते. त्यांनी कुणाल पाटील यांची रात्री गुप्त भेट घेतली होती. अशा चर्चा त्यावेळी रंगल्या होत्या. त्याचवेळी पाटील यांना गळाला लावण्याचा प्रयत्न झाला होता अशा चर्चा आता धुळ्यातील राजकीय वर्तुळात सूरू आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com