Satyajeet Tambe BJP entry : सत्यजीत तांबेंविषयी पुन्हा जोरदार चर्चा, निर्णय घेऊ शकतो; बाळासाहेब थोरात बरच बोलून गेले...

Balasaheb Thorat Reacts to Satyajeet Tambe BJP Entry : नाशिक पदवीधरचे आमदार सत्यजीत तांबे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली.
Satyajeet Tambe BJP entry
Satyajeet Tambe BJP entrySarkarnama
Published on
Updated on

Balasaheb Thorat reaction Satyajit Tambe : काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे तथा नाशिक पदवीधरचे अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी पुन्हा जोर धरला आहे. बाळासाहेब थोरात यांनी या चर्चांवर बरचं काही बोलून गेले. सत्यजीत स्वतंत्र आणि सज्ञान आहे, त्याच निर्णय तो घेऊ शकतो, असे म्हटले आहे.

दरम्यान, काँग्रेस संपलेला पक्ष आहे. त्यामुळे तिथल्या कोणत्याच नेत्यांना, कार्यकर्त्यांना भाजपमध्ये घेण्याच्या मानसिकतेत नाही, असे विधान भाजप माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी नुकताच केले. यातच सत्यजीत तांबे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलं आहे.

बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर (Sangamner) इथं माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, "तो (सत्यजीत) आता स्वतंत्र आहे. डॉ. सुधीर तांबे आणि सत्यजित तांबे यांना सगळ्या पक्षातील नेत्यांनी मतदान केलं आहे. त्याने काय निर्णय घ्यायचा तो घेऊ शकतो. तो सज्ञान आहे, त्याला आम्ही काही म्हणू शकत नाही. सत्यजित स्वतंत्र आहे, त्याचा निर्णय त्याने घ्यावा. जो अपक्ष आहे, त्याच्या बाबत काय बोलायचं?"

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या विषयावर केलेल्या विधानावर बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी फटकारलं. ते म्हणाले, "अर्थमंत्र्यांकडून असं वक्तव्य येणं शोभणार नाही. शेतकरी अडचणी असतांना सरकारने त्यांच्या पाठीमागे उभं राहणं त्यांचं कर्तव्य आहे. फुकट किती द्यायचं म्हणता, तर जनतेनं तुम्हाला मतं दिली, सत्तेत गेल्यावर असं बोलणं योग्य नाही." 2014 पासून निवडणुकीचे जुमले करण्याची सवय लागली आहे, मित्र पक्षालाही त्याची सवय लागली आहे, पण शेतकरी त्यांना माफ करणार नाही, असा टोला अजित पवार यांनी लगावला.

Satyajeet Tambe BJP entry
Sujay Vikhe Patil BJP : माझ्या ऑपरेशनमध्ये 'ठाॅय' होऊन जातो माणूस; सुजय विखेंच्या विधानानं खळबळ (Video)

बाळासाहेब थोरात काल मुंबईत मनसे आणि महाविकास आघाडीच्या सत्याचा मोर्चामध्ये सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी मोर्चात पहिलं भाषण ठोकलं. या मोर्चावर बोलताना थोरात म्हणाले, "राहुल गांधींनी जे पुरावे दिले, त्यावर निवडणूक आयोगानं थातूर-मातूर उत्तर दिले. निवडणूक आयोगाअगोदर भाजप उत्तर देतय. यावरून काय समजायचं? कोणीतरी बाहेरचा आहे, कोणी तरी आयोगाला चालवत आहे, असं वाटतं."

Satyajeet Tambe BJP entry
Donald Trump policies : डोनाल्ड ट्रम्प 2.0; भारताविरोधी वांशिक पोस्टमध्ये वाढ!

मनसेच्या निर्णयावर चुप्पी

आदित्य ठाकरे किंवा राहुल गांधीच्या प्रश्नांची उत्तरे निवडणूक आयोगाने द्यावी. भाजप नव्ह. खिजवून बोलणे मुख्यमंत्र्यांना शोभत नाही. कालचे निमत्रंण सर्व पक्षांना दिल होतं. कालचा मोर्चा हे केवळ मतदार यादीतील घोळापुरत मर्यादित होता. कुणाला सोबत घ्यायचं, याबाबत वरीष्ठ पातळीवरील नेते निर्णय घेतले जातील, असे सांगून मनसेला मविआत घेण्यावर बाळासाहेब थोरातांनी थेट बोलणे टाळलं.

आऊटगोईंग, नवं निर्मितीची संधी

'स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर होत आहे. मात्र असं घडताना नवीन रक्ताला वाव देता येतो. काँग्रेसमधून सुरू असलेल्या आऊटगोईंगवर बाळासाहेब थोरातांची सूचक प्रतिक्रिया दिली. म्हणजेच, ज्यांना जायचं आहे, ते जाऊ शकतात, असा या प्रतिक्रियेचा अर्थ निघतो. आऊटगोईंगकडे जनतेचं लक्ष असतं आणि अशाच वेळी नवं नेतृत्व तयार होत असतं. आमच्या दृष्टीने ही नवं निर्मितीची संधी असते,' असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com