एकनाथ शिंदेंकडे गर्दीसाठीच पैसे, शेतकऱ्यांसाठी पैसे नाहीत!

एकनाथ शिंदे यांनी हाडाची काडं करणाऱ्या शेतकऱ्यांचाही थोडा विचार करावा.
Sandip Jagtap
Sandip JagtapSarkarnama

नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सध्या शिवसेनेच्या (Shivsena) मेळाव्याला आव्हान देण्यासाठी शिंदे गटाच्या मेळाव्याला गर्दी जमवण्यात व्यस्त आहेत. त्यासाठी त्यांनी कोट्यावधी रुपये खर्च केले आहेत. मात्र राज्यातील (Maharashtra) शेतकरी (Farmers) संकटात असताना त्याच्याकडे लक्ष देण्यास, मदतीसाठी शिंदे यांच्याकडे पैसे नाहीत, अशी टिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप (Sandip Jagtap) यांनी केली आहे. (Swabhimani Shetkari Sanghtana criticise Cm Shinde)

Sandip Jagtap
Dasara Melava : 'गद्दारीच्या पिकाचा नायनाट कर’ ; कर्णपुरा देवीकडे दानवेंची प्रार्थना

याबाबत श्री. जगताप म्हणाले, दसरा मेळाव्याला मुंबईत गर्दी करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी एसटी महामंडळाला दहा कोटी रुपये दिले. अनेक कार्यकर्त्यांना खाजगी वाहने दिली.

Sandip Jagtap
NCP : राष्ट्रवादीला उशीरा सूचलेले शहाणपण ; सरस्वती देवी पूजनावरुन भाजपचा हल्लाबोल

बिकेसी मैदानावर कोट्यवधी रुपये खर्च होतो आहे. राजकीय कुरघोडी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे कोट्यवधी रुपये आहेत. परंतु हाडाचे काडं करून, काबाड कष्ट करून, पोटाला पीळ देऊन नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर अनुदान म्हणून ५० हजार रुपये द्यायला मात्र त्यांच्याकडे पैसे नाहीत. हे या महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.

ते पुढे म्हणाले, कुठे नेऊन ठेवलाय हा महाराष्ट्र माझा? असा प्रश्न आम्हाला पडतो. राज्यात नुकताच मोठा पाऊस झाला. अतीवृष्टीने राज्यात हाहाकारा उडाला. शेतकरी अत्यंत संकटात आहे. अनेक नेते बांधावर जातात, पाहणी करतात, घोषण होते, मात्र पुढे काहीच होत नाही. शेतकरी मदत मिळेल याची वाटच बगत बसला आहे. एकनाथ शिंदे असंवेदनशील असून त्यांना शेतकऱ्यांचे दुःख कळत नाही, असे एकंदर चित्र आहे. सबंध महाराष्ट्रातील शेतकरी त्याबाबत नाराज आहे.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com