Eknath Shinde News : मुख्यमंत्र्यांसह आठ मंत्री शनिवारी नाशिकमध्ये!

‘शासन आपल्या दारी’ एका छताखाली योजनाचे लाभ देण्याचा उपक्रम उद्या होत आहे.
Devendra Fadanvis, Ajit Pawar & Eknath Shinde
Devendra Fadanvis, Ajit Pawar & Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Government : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उद्या (ता.15) शहरात `शासन आपल्या दारी` हा उपक्रम होत आहे. यावेळी पंचवीस हजार नागरिकांची गर्दी जमविण्यात येणार आहे. यावेळी आठ मंत्री शहरात असतील. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. या कार्यक्रमाबाबत उत्सुकता आहे. (CM Eknath Shinde will attend the programme of `Government on your door` Scheme)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्या राज्यात शासन (Maharashtra) आपल्या दारी हा उपक्रम होत आहे. नाशिकला (Nashik) शनिवारी हा कार्यक्रम होत आहे.

Devendra Fadanvis, Ajit Pawar & Eknath Shinde
Breaking News : आमदार कांदेंच्या बेछूट आरोपांनी अधिकारी भोवळ येऊन पडला!

या कार्यक्रमाच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री असतील. त्यामुळे या कार्यक्रमाबाबत उत्सुकता आहे. जिल्हा प्रशासनातर्फे विविध शासकीय योजनांचे लाभ एका छताखाली देणाऱ्या ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम होणार आहे. त्यात साधारण २५ हजारांवर लाभार्थ्यांना एकाच छताखाली लाभ देण्याचे नियोजन आहे.

पालकमंत्री दादा भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन झालेल्या या उपक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ, उदय सामंत, विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ, गिरीश महाजन, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार आदींसह विविध खात्याचे आठ मंत्री उपस्थित राहणार आहेत.

Devendra Fadanvis, Ajit Pawar & Eknath Shinde
Ajit Pawar news ; तिढा सुटणार ; आज खातेवाटप होणार ! | Politics | Maharashtra | Sarkarnama

एका छताखाली लाभ

शहरात राबविल्या जाणाऱ्या ‘शासन आपल्या दारी’ या जिल्हास्तरीय उपक्रमासाठी सरकारी यंत्रणेची जय्यत तयारी सुरू आहे. व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेच्या डोंगरे वसतिगृहाच्या मैदानावर पावसाची शक्यता गृहीत धरून थोडा मुरूम टाकण्यात आला आहे. तसेच भव्य वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आला आहे. विविध प्रमाणपत्रांपासून तर घरकुल योजना, शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर योजनेसह विविध सरकारी योजनेतील लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लाभ देऊन गौरविण्यात येणार आहे.

प्रत्येक तालुक्यातील लाभार्थ्यांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. ऐन पावसाळ्यात २५ हजारांच्या आसपास लाभार्थी या कार्यक्रमाचा लाभ घेतील. त्यानंतर त्याच्या भोजनासह त्यांना राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसने त्यांच्या निवासस्‍थानी सोडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शहर-जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या वाहतुकीसाठी ४५० बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

Devendra Fadanvis, Ajit Pawar & Eknath Shinde
Chhagan Bhujbal News : `डीपीडीसी` पेक्षा मला मतदार महत्त्वाचे आहेत!

जिल्ह्याच्या बाहेरून मुंबईतून अनेक जण येणार असल्याने त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील हजारो लाभार्थ्यांना एकाच छताखाली लाभ देणारा आणि शासकीय निर्धारित शुल्कात दोनशेवर योजनांचा लाभ जनतेला मिळावा, यासाठी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘शासन आपल्या दारी’ हा अभिनव आणि प्रशासन गतिमान करणारा उपक्रम हाती घेतला आहे. एसटी बसची व्यवस्था, लाभार्थ्यांचा जेवणाचा खर्च, योजना प्रचार प्रसिद्धी तसेच सरपंचांना फेटा, सांस्कृतीक कार्यक्रम यांसह विविध पातळ्यांवर तयारी सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com