MLA Suhas Kande News : जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत आज पालकमंत्री दादा भुसे यांच्या कामकाजाविरोधातील खदखद आमदारांनी व्यक्त केली. यामध्ये शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी जिल्हा परिषदेच्या एका अधिकाऱ्याला टार्गेट करीत एव्हढे आरोप केले की, त्या अधिकाऱ्याला भोवळ आली. हा अधिकारी बैठकीतच कोसळल्याने गदारोळ झाला. (The work of the guardian minister was revealed in the district planning meeting)
नाशिक (Nashik) जिल्हा नियोजन आणि विकास मंडळाची बहुचर्चीत बैठक आज जिल्हाधिकारी (Collector) कार्यालयात पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यात पालकमंत्र्यांच्या कारभारावर आमदारांनी अप्रत्यक्षरित्या व चर्चीत आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांनी थेट आरोप केल्याने प्रचंड आरोप केल्याने गोंधळ झाला.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यात जिल्हा प्रशासनाने आणि विशेषतः जिल्हा परिषदेतंर्गत मंजूर केलेल्या कामांबाबत प्रचंड संताप होता. पालकमंत्र्यांविरोधातील हा संताप आमदारांनी प्रशासनाला टिकेचे लक्ष्य करून साध्य केला. हे सर्व आरोप थेट पालकमंत्र्यांवरच असल्याचे बोलले जाते.
या बैठकीत शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी माझ्या मतदारसंघातील बेचाळीस गावांत कोणतीच कामे मंजूर केली नाही. हा सर्व प्रशासनाने केलेला गोंधळ आहे. जिल्हा परिषदेचे अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे यांचे नाव घेऊन त्यांनी थेट अत्यंत गंभीर तसेच बेफाम आरोप केले. ज्याबाबत आरोप केले ते सर्व कामे पालकमंत्र्यांच्या सहीने मंजूर झालेली होती.
संबंधीत अधिकारी त्याबाबत खुलासा करीत होता. ही कामे व निर्णय माझे नाहीत, असे त्यांनी वारंवार सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तसेच अन्य आमदारांनीही आरोप केले. त्यांचा सगळ्यांचा रोख पालकमंत्र्यांकडे होता, मात्र ते टिका जिल्हा परिषद प्रशासनावर करीत होते. यावेळी आमदार कांदे श्री. गुंडे यांच्याबाबत आरोप करीतच राहिले. टिका करतांना ते थांबतच नव्हते. आरोप करीतच राहिल्याने बैठकीत गोंधळ उडाला. त्यात हा अधिकारी मानसिक धक्का बसल्याने भोवळ येऊन बैठकीतच कोसळला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.