
Chhagan Bhujbal Nashik visit : `डीपीडीसी`, `एपीएससी` आणि बरेच काही असेल, पण माझ्या दृष्टीने मतदार महत्त्वाचे आहेत. ते आम्हाला निवडून देतात. त्यामुळे मी माझ्या मतदारसंघातील मतदारांना भेटण्यास प्राधान्य देणार असल्याचे सांगत मंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला जाण्याचे टाळले, यावर थेट उत्तर देणेही टाळले. (Bhujabl visits his yeola constituency first time after taken oath as Minister)
राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) बंडखोर, मंत्री छगन भुजबळ (Chahgan Bhujbal) यांनी आज नाशिकचा (Nashik) दौरा केला. त्यांनी येवला मतदारसंघाला भेट दिली. यावेळी मार्गावर त्यांचे समर्तकांनी स्वागत केले.
यावेळी पत्रकारांशी बोलताना श्री. भुजबळ म्हणाले, कार्यकर्त्यांत उत्साह आहे. येवल्यातील कार्य्कर्त्यांनी मला वारंवार विनंती करून बोलावले आहे. त्यामुळे आजचा दौरा आहे. नियोजन मंडळाच्या बैठकीपेक्षा मतदार महत्त्वाचा आहे. कारण मतदार आम्हाला निवडून देतात. डीपीटीसी वगैरे बैठका तर सतत होतच असतात. मात्र मतदार तेव्हढाच मह्त्तवाचा आहे.
राज्याच्या मंत्री मंडळात शपथ घेतल्यानंतर मंत्री भुजबळ आज येवला दौऱ्यावर आहेत. नाशिक विमानतळावर पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी तसेच जानोरी येथील नागरिकांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर ते येवल्याला रवाना झाले. येवल्याच्या मार्गावर देखील ठिकठिकाणी त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, आमदार दिलीप बनकर, आमदार हिरामण खोसकर, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, विष्णुपंत म्हैसधूने, गोरख बोडके, उषाताई बच्छाव, राजेंद्र शिंदे, डॉ. योगेश गोसावी, संजय खैरनार, सुरेश खोडे, अॅड. रवींद्र पगार, गणेश तिडके यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.