Sudhakar Badgujar Politics: बडगुजर झाले ‘संकटमोचका’चरणी लीन, पक्षांतर्गत विरोधकांना दोघांनीही दिला संदेश!

Commissioner Girish Mahajan Meets Sudhakar Badgujar: भाजप नेते गिरीश महाजन यांचा सुधाकर बडगुजर यांच्या भेटीतून बडगुजर विरोधकांना संदेश.
Sudhakar Badgujar  & Girish Mahajan
Sudhakar Badgujar & Girish MahajanSarkarnama
Published on
Updated on

Sudhakar Badgujar News: भाजप नेते गिरीश महाजन शुक्रवारी नाशिकच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या या दौऱ्यात आमदार देवयानी फरांदे वगळता अन्य लोकप्रतिनिधी अदृश्य होते. यातून गिरीश महाजन यांच्याबाबत वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न स्थानिक नेत्यांनी केला.

शुक्रवारी मंत्री गिरीश महाजन यांनी सिंहस्थ कामाच्या आढाव्यासाठी बैठक घेतली. यावेळी त्यांनी महापालिका कार्यालयाला भेट दिली. या भेटीत महापालिका आयुक्तांना भेटण्याआधी मंत्री महाजन सुधाकर बडगुजर यांच्या महापालिका कर्मचारी सेनेच्या कार्यालयात भेट दिली. यावेळी सुधाकर बडगुजरमंत्री महाजन यांच्या पुढे लीन होत त्यांच्या पाया पडले. त्यातून महाजन यांनी वेगळाच संदेश दिला आहे.

त्यानंतर महापालिका आयुक्तांच्या दालनात झालेल्या बैठकीत देखील सुधाकर बडगुजर प्रामुख्याने उपस्थित होते. साखर बडगुजर आणि महापालिकेचे प्रशासन याबाबत भाजपच्या नेत्यांनी विविध आरोप केले आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्री महाजन यांनी सुधाकर बडगुजर यांचे गॉडफादर असल्याचा संदेश या निमित्ताने दिला. भाजपच्या निष्ठावंतांना यातून त्यांना काय संदेश द्यायचा आहे हे स्पष्ट आहे. यानिमित्ताने श्री. बडगुजर मात्र फायद्यात असून त्यांच्या दृष्टीने संजय राऊत गेले अन् गिरीष महाजन गॉडफादर झाले.

Sudhakar Badgujar  & Girish Mahajan
Nashik Kumbh Mela: कुंभमेळ्यानिमित्त नाशिकमध्ये राजकीय घडामोडींची नांदीच; ‘सबकुछ’ सरकार, प्रशासन

मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपच्या नाशिकच्या राजकारणावर आपली पकड कायम ठेवण्यासाठी केलेली खेळी यानिमित्ताने यशस्वी झाली अशी चर्चा आहे. जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार असूनही गेली १५ वर्ष त्यांना राज्यस्तरावर कोणतीही संधी मिळाली नाही. जिल्ह्याचे नेतृत्व सातत्याने गिरीश महाजन यांच्याकडे राहिले आहे.

नाशिक शहरात भाजपचे तीन आमदार आहेत. सध्या गिरीश महाजन यांनी महापालिका निवडणुकीसाठी जी भूमिका घेतली आहे त्याला स्थानिक नेत्यांचा विरोध आहे. निष्ठाव॑तांपेक्षा आयाराम आणि गयाराम यांना महत्त्व देण्याचे महाजन यांचे धोरण आहे.

त्याचाच परिणाम म्हणून भाजपचे शहरातील दोन आमदार मंत्री महाजन यांच्या दौऱ्यात दिसले नाही. पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि माजी नगरसेवक देखील महाजन यांच्या दौऱ्यात अदृश्य होते. त्यामुळे महाजन यांच्या धोरणाने भाजपमध्ये निर्माण झालेली दुफळी लपून राहिली नाही. कदाचित मंत्री महाजन यांना देखील हेच अपेक्षित असल्याने, त्यांचे डावपेच यशस्वी झाल्याची चर्चा होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com