Nilesh Lanke On ADCC Bank Bharati : खासदार लंकेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र; जिल्हा बँक भरतीवरून मोठी तक्रार

ADCC Bank Bharati 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके यांनी अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेतील 696 जागांच्या भरतीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले.
Nilesh Lanke On ADCC Bank Bharati
Nilesh Lanke On ADCC Bank BharatiSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये 696 जागांवरील नोकरभरती प्रक्रियेस स्थगिती देण्याची मागणी खासदार नीलेश लंके यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे यासंदर्भात पत्रव्यवहार केला आहे.

ही भरती प्रक्रिया राबविणाऱ्या वर्क वेल या कंपनीवर खासदार लंके यांनी आक्षेप घेतला असून बेकायदेशीरपणे पॅनलवर नेमलेल्या या कंपनीस पॅनलवरून दूर करण्याची मागणीही त्यांनी पत्राद्वारे केली आहे. खासदार लंके यांनी आक्षेप घेतल्याने जिल्हा बँकेची भरती वादात अडकण्याची शक्यता आहे.

खासदार नीलेश लंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, वर्क वेल कंपनीचा सहकार आयुक्तालयाने बेकायदेशीरपणे तालिकेत समावेश केला असून राज्यातील अनेक विभागांच्या भरती प्रक्रियेसाठी या कंपनीची निवड करण्यात आली आहे. वर्क वेल कंपनीचा अनुभव पाहता सरकारच्या आदेशाप्रमाणे पूर्ण होत नाही. राष्ट्रीयकृत बँका, खासगी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, नागरी सहकारी बँका तसेच सरकारमधील विविध विभागांसाठी किमान तीन वेळा ऑनलाईन नोकर भरती प्रक्रिया राबविल्याचा अनुभव असला पाहिजे या अटीत ही कंपनी पात्र ठरत नाही, असे खासदार नीलेश लंके यांनी लक्ष वेधले आहे.

Nilesh Lanke On ADCC Bank Bharati
Radhakrishna Vikhe Vs Balasaheb Thorat : थोरात 'समन्यायी'चे खलनायक; मंत्री विखेंचा हल्लाबोल

किरकोळ स्वरूपाच्या भरतीचा अनुभव

वर्क वेल कंपनीने यापूर्वी राज्यातील काही बँका (Bank) , पतसंस्था, रेल्वे नगर परिषदेत किरकोळ नोकर भरतीची प्रक्रिया राबविली आहे. शिवाय त्यातील बहुतांशी पदे कंत्राटी स्वरूपाची आहेत. ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या लिपिक आणि शिपाई या भरतीची प्रक्रिया या कंपनीने राबविली असून सरकारच्या निकषानुसार केवळ ठाणे जिल्हा बँकेच्या नोकरभरतीचा एकच अनुभव या कंपनीकडे आहे. सरकारच्या आदेशात नमुद केल्याप्रमाणे या कंपनीकडे अनुभव नाही.

Nilesh Lanke On ADCC Bank Bharati
Nashik politics: इच्छुक मामा ठाकरेंची झणझणीत मिसळ आमदार सीमा हिरे यांनीही चाखली!

भरतीचा निर्णय कायदेशीर आहे का?

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेने सहकारी साखर कारखान्यांना बेकायदेशीर कर्ज वितरण केले आहे. बँकेचा सीडी रेशो घसरला आहे. त्याबाबत विभागीय सहनिबंधक नाशिक यांनी चौकशी सुरू केली आहे. बँक सक्षम मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचा शोध न घेता रावसाहेब वर्पे यांना वयाच्या साठीनंतरही बेकायदेशीरपणे वारंवार मुदतवाढ देत आहेत. संचालक सीताराम गायकर निवडणूक लढविण्यास पात्र नसताना त्यांना बँकेने आणि उपनिबंधक कार्यालयाने निवडणूक लढवू दिली. बँकेचे अनेक संचालक बैठकांनाच उपस्थित नसतात. त्यामुळे अशा परिस्थितीत या बँकेत भरतीबाबत घेतलेला निर्णय कायदेशीर आहे का? हा प्रश्‍न असल्याचेही खासदार लंके यांनी म्हटले आहे.

'ADCC' मध्ये 696 जागांसाठी अर्ज

अहमदनगर येथील जिल्हा सहकारी बँकेनं 696 जागांसाठी अर्ज मागवले आहेत. ही सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे क्लार्क, वाहनचालक आणि सुरक्षारक्षक ही पदांसाठी भरती आहे. जिल्हा बँकेच्या वेबसाईटवर ऑनलाईनपद्धतीने 27 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. क्लार्क पदासाठी 687, वाहनचालक 4 आणि सुरक्षारक्षकांची 5 पदं भरली जाणार आहेत. विशेष बाब म्हणजे, या ठिकाणी कोणतंही सामाजिक आणि समांतर आरक्षण लागू असणार नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com