Nashik politics: इच्छुक मामा ठाकरेंची झणझणीत मिसळ आमदार सीमा हिरे यांनीही चाखली!

Nashik politics BJP MLAs at the Misal party of Mama Thackeray-शिवसेना शिंदे गटाचे इच्छुक मामा ठाकरे यांच्या मिसळ पार्टीने सिडकोच्या राजकारणाला खमंग स्वाद चढला. या मिसळ पार्टीला चार हजारांहून अधिक राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी हजेरी लावली
MLA Seema Hiray, Mama Thackrey & Mahesh Hiray
MLA Seema Hiray, Mama Thackrey & Mahesh HiraySarkarnama
Published on
Updated on

Nashik Assembly Election Politics News: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार विविध क्लुप्त्या करीत आहेत. यामध्ये मुख्यमंत्री शिंदे गटाच्या एका इच्छुकाने झणझणीत मिसळ पार्टी ठेवली. तिला हजारो राजकीय कार्यकर्त्यांनी हजेरी लावल्याने अक्षरशः जत्रेचे स्वरूप आले.

नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघात सध्या जोरदार राजकीय हालचाली आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने या मतदारसंघावर दावा केला आहे. सुधाकर बडगुजर हे त्या पक्षाचे इच्छुक उमेदवार आहेत. भारतीय जनता पक्षाच्या आमदार सीमा हिरे गेली दोन टर्म येथून निवडून आल्या आहेत.

अशा स्थितीत महायुतीत ही जागा कोणाला यावरून घटक पक्षांच्या नेत्यांमध्ये जोरदार स्पर्धा सुरू आहे. एकमेकांना आव्हान देण्याची तयारी देखील सुरू आहे. त्यातच मुख्यमंत्री शिंदे गटाचे नेते आणि इच्छुक माजी आमदार बळीराम उर्फ मामा ठाकरे यांनी मतदारसंघात प्रचार मोहीम सुरू केली आहे.

या मोहिमेचा भाग म्हणून त्यांनी नुकतीच मिसळ पार्टी ठेवली. या मिसळ पार्टीला चार हजारांहून अधिक राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. या मिसळ पार्टीला एवढी झुंबड उडाली की मंगल कार्यालय देखील कमी पडले. त्यामुळे ही मिसळ पार्टी चर्चेचा विषय आहे.

MLA Seema Hiray, Mama Thackrey & Mahesh Hiray
Malegaon Politics: महापालिका आयुक्त विरोधात थेट एसीबी कडे धाव, कचऱ्यावरून राजकारण तापले

या मिसळ पार्टीच्या कार्यक्रमात माजी महापौर प्रकाश मते, शेकापचे माजी उपमहापौर मनीष बस्ते, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, काँग्रेसचे माजी नगरसेवक लक्ष्मण जायभावे, भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक बाळासाहेब पाटील, कैलास अहिरे, सतीश सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी खासदार देविदास पिंगळे, भाजप नेते शशिकांत जाधव अशा अनेक आणि सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावली.

विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीची चर्चा आणि त्यासाठी तयारी करीत असलेले मामा ठाकरे यांचे या सर्वच नेत्यांनी कौतुक केले. त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा देखील दिल्या. मात्र हा कार्यक्रम सुरू असताना भाजपच्या विद्यमान आमदार आणि आगामी निवडणुकीसाठी प्रमुख दावेदार आमदार सीमा हिरे या थेट व्यासपीठावर उपस्थित होत त्यांनी सर्वांना धक्काच दिला.

आमदार हिरे यांनी देखील श्री ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या. त्यामुळे ठाकरे यांनी महायुती नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघाची जागा भारतीय जनता पक्षाकडे असतानाही शिंदे गटातर्फे त्यावर दावा सांगितला आहे. असे असतानाही भाजपच्या विद्यमान आमदार हिरे यांनी मिसळ पार्टीला हजेरी लावली.

MLA Seema Hiray, Mama Thackrey & Mahesh Hiray
Ajit Pawar Politics: राष्ट्रवादीच्या महिलांच्या सुचक घोषणा, 'लाडक्या बहिणी कुणाच्या, अजित दादाच्या'

आमदार हिरे आणि त्यांचे पती महेश हिरे यांनी देखील खमंग मिसळ आणि चटकदार रस्त्याची चव चाखली. आता या झणझणीत मिसळीचा राजकीय ठसका कोणाला लागतो, याची उत्सुकता आहे.

या मतदार संघातून श्री ठाकरे यांनी आपण इच्छुक उमेदवार असल्याचे यावेळी स्पष्ट केले. गेली तीस वर्ष केलेल्या कामाच्या जोरावर आपल्यालाच उमेदवारी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी शिंदे गटाचे पदाधिकारी त्याहीपेक्षा अधिक संख्येने भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यामुळे भाजपकडे असलेल्या या मतदारसंघावर महायुतीतच जागा वाटपावरून वाद होण्याची चिन्हे आहेत.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com