Congress Nashik News : नाशिकच्या ड्रग्ज प्रकरणात काँग्रेसचे पुढचे पाऊल काय?

Congress aggressive on Drugs & Crime issue in Nashik City-ड्रग्जविरोधात राजकीय मुद्दा मिळाल्याने काँग्रेस कंबर कसून मैदानात उतरली
Congress Agitation in Nashik
Congress Agitation in NashikSarkarnama
Published on
Updated on

Nashik Drugs Politics : ड्रग्ज तस्कर ललित पाटील याला पोलिसांनी चैन्नईतून अटक केल्यानंतर या विषयावरील राजकारण थांबेल, हा पोलिसांचा कयास सपशेल फोल ठरला आहे. याविषयावर काँग्रेसच्या मानवी साखळीला अनपेक्षीत प्रतिसाद मिळाला. (Politics on High mode in Nashik on all political parties)

यासंदर्भात पहिल्यांदाच काँग्रेसने (Congress) शहराच्या (Nashik) राजकारणाची अचुक नस हेरून आंदोलन केले आहे. या विषयावर शिवसेनेच्या (Shivsena) आक्रमकतेमुळे राज्य शासनापासून तर पोलिस यंत्रणा (Police) देखील आळस झटकून कामाला लागली आहे.

Congress Agitation in Nashik
Eknath Khadse News : एकनाथ खडसे कुटुंबीयांना तब्बल १३७ कोटींचा दंड?

राज्यभर गाजत असलेल्या नाशिक शहरातील ड्रग्ज प्रकरणावर शहर काँग्रेसने ‘नाशिक वाचवा- ड्रग्ज हटवा’ ही मोहीम सुरू केली आहे. याचा भाग म्हणून शहरातील ड्रग्जच्या काळा बाजाराच्या विरोधात काँग्रेसने कॉलेज रोड भागात मानवी साखळी करून रस्त्यावर उतरून आंदोलन केले.

शहराला ड्रग्जचा विळखा होत असल्याने शहर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजेंद्र बागूल यांनी ‘नाशिक वाचवा- ड्रग्ज हटवा’ ही मोहीम सुरू केली. गेल्या आठवड्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. कॉलेज रोड, गंगापूर रोड या परिसरात अनेक महाविद्यालये व मुला-मुलींची वसतिगृहे असल्याने जनजागृती व्हावी, या उद्देशाने बुधवारी काँग्रेसतर्फे मानवी साखळी करण्यात आली. सायंकाळी भोसला चौकापासून मॉडर्न कॉलनीपर्यंत ही साखळी करण्यात आली होती.

मंत्रभूमी असलेल्या नाशिक शहराचे नाव ड्रग्ज प्रकरणामुळे खराब झाले आहे. त्यासाठी ही मोहीम सुरू केल्याचे शहराध्यक्ष अॅड. आकाश छाजेड यांनी सांगितले. ड्रग्जला तरुणाई आहारी जात असून, कुटुंब उद्‍ध्वस्त होत आहे. त्यासाठी नाशिक शहराला ड्रग्ज शहर होण्यापासून वाचविणे ही नाशिकरांची जबाबदारी आहे, असे श्री. बागूल यावेळी म्हणाले.

ड्रग्ज विरोधात शहरातील चौकाचौकांत आंदोलन केले जाणार असल्याचे स्वप्नील पाटील यांनी सांगितले. त्यामुळे आता काँग्रेस पुढे काय पाऊल टाकते, याची उत्सुकता आहे.

Congress Agitation in Nashik
Nashik Drug Politics : ड्रग्ज प्रकरणावरून दोन्ही शिवसेनेत जोरदार जुंपली!

साखळी आंदोलनात प्रदेश सरचिटणीस हेमलता पाटील, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष हनीफ बशीर, अनुसूचित जमाती विभागाचे शहराध्यक्ष संतोष ठाकूर, माजी नगरसेविका वत्सला खैरे, महिला शहराध्यक्षा स्वाती जाधव, विजय पाटील, कैलास कडलक, बबलू खैरे, जावेद इब्राहिम, ज्ञानेश्वर काळे, फारुख मन्सूरी, इसाक कुरेशी, गौरव सोनार, कल्पेश जेजुरकर यांसह महाविद्यालयीन तरुण व तरुणी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

Congress Agitation in Nashik
Aditya Thackeray Visit Nanded : खासदाराने स्वच्छतागृह साफ करायला लावले, त्या अधिष्ठात्यांचा ठाकरेंकडून योग्य सन्मान...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com