Sugar Industry Crisis : धर्माच्या राजकारणात शेतकऱ्यांचे प्रश्न हरवले; साखर निर्यातबंदीवरून बाळासाहेब थोरातांचा केंद्रावर हल्लाबोल

Former minister Balasaheb Thorat warns crisis sugar industry due to export restrictions, rising costs, and political diversion from real issues like inflation and unemployment : साखर उद्योग संकटात, खासगी कारखान्यांची वाढती स्पर्धा आणि निर्यातबंदीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था धोक्यात असल्याचा इशारा देताना भाजपच्या धार्मिक राजकारणावर बाळासाहेब थोरात यांनी टीका केली.
Balasaheb Thorat Sugar
Balasaheb Thorat SugarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra sugar factories news : साखर उद्योग सध्या मोठ्या अडचणीतून जात असून, केंद्र सरकारने साखर निर्यातीवर घातलेल्या निर्बंधांमुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. खासगी साखर कारखान्यांची वाढती स्पर्धा, उत्पादन खर्चातील वाढ आणि विजेच्या प्रश्नांमुळे सहकारी साखर उद्योगावर दबाव निर्माण झाला आहे.

त्यामुळे उसाचे क्षेत्र वाढवण्याबरोबरच उत्पादकता वाढवून प्रति एकर 100 टन उत्पादन घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. तसंच महागाई, बेरोजगारी, शेती आणि उद्योग यांसारख्या प्रश्नांवर चर्चा होण्याऐवजी धार्मिक ध्रुवीकरणाला खतपाणी घातले जात आहे, ही चिंतेची बाब आहे, असे निरीक्षणही त्यांनी नोंदवले.

संगमनेर (Sangamner) तालुक्यातील जोर्वे येथे सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीने आयोजित ऊस विकास मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार सुधीर तांबे, दुर्गा तांबे, वसंतदादा शुगर इन्स्टि्टयुटचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अशोक कडलग, पांडुरंग घुले, मृदाशास्त्रज्ञ डॉ. अभिनंदन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) म्हणाले की, केंद्र सरकारच्या साखर निर्यात धोरणामुळे साखर उद्योग अडचणीत आला असून, याचा थेट परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होत आहे. साखर कारखानदारी संकटात आली तर शेतकरी, कामगार आणि ग्रामीण बाजारपेठ यांच्यावर मोठा आर्थिक परिणाम होईल,” असे त्यांनी नमूद केले.

Balasaheb Thorat Sugar
Sangamner water crisis : लोकांनी हवा प्यायची का? पाणीटंचाईवर मंत्री विखेंचा प्रशासनाला दम, अधिकाऱ्यांची बैठकीत खरडपट्टी

खासगी साखर कारखान्यांची संख्या वाढल्याने स्पर्धा तीव्र झाली असली तरी, आपल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने अल्कोहोल निर्मिती, वीज निर्मिती, काटकसर आणि वेळोवेळी घेतलेल्या योग्य निर्णयांमुळे आर्थिक स्थैर्य राखल्याचे थोरात यांनी सांगितले.

Balasaheb Thorat Sugar
Rahul Gandhi on NEET leak : ‘NEET’ची मुख्यच नव्हे, तर राखीव प्रश्नपत्रिकाही फुटली? शिक्षणमंत्री अजून पदावर का? राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

निळवंडे धरण प्रकल्प आणि कालव्यांच्या कामांचा उल्लेख करताना थोरात म्हणाले की, दुष्काळी भागासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. डाव्या आणि उजव्या कालव्यातून पाणी सुरू झाल्याने शेतीला दिलासा मिळाला आहे. मात्र, भविष्यातील आव्हाने लक्षात घेता उसाचे क्षेत्र वाढवण्याबरोबरच उत्पादनक्षमता वाढवणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विजेच्या वाढत्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन सरकारकडे ठोस भूमिका मांडण्याचे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी त्यांनी राज्यासह देशातील सध्याच्या राजकीय वातावरणावरही भाष्य केले. धर्माच्या नावावर सुरू असलेल्या राजकारणामुळे सामान्य नागरिक, शेतकरी आणि युवा पिढीच्या मूलभूत प्रश्नांकडून लक्ष विचलित होत असल्याची टीका त्यांनी केली. महागाई, बेरोजगारी, शेती आणि उद्योग यांसारख्या प्रश्नांवर चर्चा होण्याऐवजी धार्मिक ध्रुवीकरणाला खतपाणी घातले जात आहे, ही चिंतेची बाब आहे, असे निरीक्षण बाळासाहेब थोरात यांनी नोंदवले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com