Jayashree Thorat Case : जयश्री थोरातांसह 3500 आंदोलकांवर गुन्हा; बाळासाहेब थोरातांचे नाव नाही, चर्चांना उधाण

Jayashree Thorat Protest Case: नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेसाठी संगमनेरमध्ये रास्ता रोको; जमावबंदी आदेशाचे उल्लंघन आणि वाहतूक रोखल्याप्रकरणी पोलिसांची कारवाई.
Balasaheb Thorat daughter Jayashree Thorat
Balasaheb Thorat daughter Jayashree ThoratSarkarnama
Published on
Updated on

Nashik Pune Semi High Speed Railway: काँग्रेस नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरात यांच्यासह साडेतीन हजार आंदोलकांवर जमावबंदी आदेशाचे उल्लंघनप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे संगमनेर मार्गे सरळ रेषेत होण्यासाठी केलेल्या आंदोलनात, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करत बेकायदेशीरपद्धतीने जमाव जमवत रास्ता रोको आंदोलन केल्याचा हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संगमनेर (Sangamner) तालुक्यातील हिवरगाव पावसा टोलनाक्यावर बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले होते. बाळासाहेब थोरात यांनी आंदोलनात सहभागी घेत, आंदोलकांना मार्गदर्शन करत संगमनेरसाठी ही रेल्वे किती गरजेची आहे, हे सांगितले होते.

जयश्री थोरात यांच्यासह हजारो संगमनेरकर मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. बाळासाहेब थोरात यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले असतानाही त्यांचे गुन्ह्यात नाव नसल्याने, राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. या आदेशाच्या उल्लंघनप्रकरणी हा गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. जमावबंदी आदेश लागू असल्याने आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती.

परवानगी नसतानाही मोठ्या संख्येने आंदोलक जमले आणि रस्त्यावर ठिय्या देत वाहतूक रोखल्याचा पोलिसांचा आरोप आहे. जमावबंदी आदेशाचे उल्लंघन आणि वाहतूक विस्कळीत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

Balasaheb Thorat daughter Jayashree Thorat
Pune Nashik Railway : ‘काकोडकर समिती म्हणजे पुन्हा शून्यातून सुरुवात’; पुणे-नाशिक रेल्वेवरून थोरातांचा सरकारवर घणाघात

बाळासाहेब थोरातांची कन्या जयश्री थोरात यांच्यासह सुमारे साडेतीन हजार आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करत ही मोठी कारवाई केली आहे. या आंदोलनामुळे नाशिक पुणे महामार्ग अडवल्यानं महामार्ग जवळपास दोन ते तीन तास ठप्प झाला होता.

Balasaheb Thorat daughter Jayashree Thorat
Dheerajsinh Rajput Murder : धीरजसिंह हत्या प्रकरणात जमाव संतप्त; पडळकरांचा फडणवीसांना फोन, CM म्हणाले, ‘ही प्रवृत्ती ठेचणार’

जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अजय फटांगरे, बाळासाहेब थोरातांची कन्या जयश्री थोरात, शरदनाना थोरात, किशोर टोकसे, अमोल शेलकर, विजय रहाणे, नामदेव गुंजाळ, भाऊसाहेब रहाणे, सागर पावसे, डॉ. दानिश खान आणि नूरमोहंमद शेख या प्रमुखांची नावे गुन्ह्यात घेत, इतर साडेतीन हजार आंदोलकांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

बाळासाहेब थोरात यांचे भाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी रेल्वेसाठी नाशिक येथे आंदोलन केले होते. या आंदोलनात शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार राजाभाऊ वाजे सहभागी झाले होते. तांबे अन् वाजे यांना नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतले होते. शिरूरमधील खासदार अमोल कोल्हे यांनी जुन्नर-खेड येथे आंदोलनात सहभागी झाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com