Dhule Lok Sabha Seat Dispute: धुळे लोकसभा जागेवर काँग्रेस-राष्ट्रवादी दोघांचाही दावा; तिढा सुटणार कसा?

Dhule Lok Sabha Dispute : धुळ्याच्या जागेवर दोन्ही पक्षांच्या शहराध्यक्षांनी ठोकला दावा..
Dhule Lok Sabha Dispute : Ajit Pawar
Dhule Lok Sabha Dispute : Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Dhule News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्षांची राज्यातल्या मतदारंसंघासाठी चाचपणी सुरू आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे लोकसभेची जागेवरून आघाडीमध्ये दावा प्रतिदावा होत आहे. धुळ्याची जागा काँग्रेस पक्षाकडेच असावी. मागील तीन - तीन ते चार निवडणुकीत या ठिकाणी धुळे मध्य, धुळे बाह्य व शिंदखेडा अशा विभागातून उमेदवार देण्यात आले होते. आता पुढच्या निवडणुकीत मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य व बागलाण या भागातूनच उमेदवार असायला हवे, अशी मागणी काँग्रस जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी केली. (Dr. Tushar Shewale deemands Dhule Constitency should kept with Congress)

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनेही धुळ्याची जागा आगामी लोकसभा निवडणुकीत आपल्याकडे राहावी, अशी आग्रही मागणी केली आहे. धुळे लोकसभा या मतदारसंघात काँग्रेसचा मागील तीन निवडणुकात सलगपणे पराभव झाला आहे. तर या धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद लक्षात घेता, येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत धुळ्याची जागा आता काँग्रेसने लढवू नये. ती राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे लढविण्यात यावी अशी कार्यकर्त्यांची भावना आहे.

Dhule Lok Sabha Dispute : Ajit Pawar
Pandharpur News : पंढरपुरात भगीरथ भालके, कल्याणराव काळे, अभिजित पाटील आले एकत्र : निर्णयाकडे तालुक्याचे लक्ष

कार्यककर्त्यांची हीच भावना लक्षा घेऊन, राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या सर्वेक्षणातही राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवाराला हमखास यश मिळणार असल्याचे दिसून आले आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार यांनी दिली आहे. यामुळे धुळ्याच्या जागेवर आता दोन्ही काँग्रेसकडून दावा ठोकण्यात येत आहे. यामुळे आगामी काळात याच जागेवरून बिघाडी होणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

काँग्रेसने ही जागा सोडणार नसल्याचे ठामपणे सांगितले आहे. धुळे लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ आहे. मागील अनेक निवडणुकांमध्ये नेहमीच काँग्रेसला भरभरून मतदान झाले. मालेगाव आणि धुळे हे विधानसभा मतदारसंघदेखील नेहमी काँग्रेसकडेच राहिले. यामुळे हे समीकरण लक्षात घेता धुळे लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडेच राहावा, अशी मागणी करण्यात आली आहे. मुंबईमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सभागृहात झालेल्या लोकसभा मतदारसंघ आढावा बैठकीत डॉ. शेवाळे यांनी ही मागणी केली.

Dhule Lok Sabha Dispute : Ajit Pawar
Shiv Sena Bhavan News : काय सांगता ! 'शिवसेना भवना'ला मोठं खिंडार ; पगारवाढ दिली नाही म्हणून चौघे कर्मचारी.. ; असं पहिल्यांदाच..

यावेळी प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नाना पटोले अध्यक्षस्थानी होते. विधिमंडळ नेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, नसीर खान, सतेज पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील, चंद्रकांत हंडोरे, बसवराज पाटील, आमदार प्रणिती शिंदे, डॉ. शोभा बच्छाव आदी या वेळी उपस्थित होते.

बैठकीत धुळे लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेस पक्षानेच लढवावा अशी मागणी सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली. यावेळी जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष यांनी मते मांडली. इच्छुकांमध्ये आमदार कुणाल पाटील, नाशिक जिल्हाध्यक्ष डॉ. शेवाळे, धुळे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांची नावे चर्चेत आली. आमदार पाटील म्हणाले, की धुळे लोकसभेची जागा काँग्रेस पक्षाचीच आहे व काँग्रेसच येथून निवडणूक लढवेल.

Dhule Lok Sabha Dispute : Ajit Pawar
Bhagirath Bhalke In Hyderabad : चार्टड विमानाने भगीरथ भालके चंद्रशेखर रावांच्या भेटीला; राष्ट्रवादीला मोठा धक्का !

डॉ. शेवाळे उमेदवारी करीत असतील, तर आपण सर्व त्यांना पाठिंबा देऊ. श्री. सनेर यांनीही मनोगत व्यक्त केले. आमदार पाटील किंवा डॉ. शेवाळे हे उमेदवारी करीत नसतील, तर मी उमेदवारी करण्यास तयार आहे, असे त्यांनी सांगितले. तर, आमदार पाटील यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा नसल्याचे सांगितले. सटाण्याचे तालुकाध्यक्ष किशोर कदम, अनिल पाटील, मालेगाव तालुकाध्यक्ष डॉ. राजेंद्र ठाकरे आदींनी डॉ. शेवाळे यांच्या नावाची शिफारस केली. कॉंग्रेसचे पदाधिकारी व धुळे लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com