Nandgaon APMC Election: आमदार सुहास कांदेंनी महाविकास आघाडीचा धुव्वा उडवला!

Nandgaon Bazar Samiti: नांदगावला १५ जागा जिंकत एकनाथ शिंदे गटाच्या आमदार सुहास कांदे यांच्या‘शेतकरी विकास’ची सत्ता
Suhas Kande
Suhas KandeSarkarnama
Published on
Updated on

Suhas Kande News: जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या नांदगाव बाजार समितीच्या निवडणुकीत शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी विकास पॅनेलने अठरापैकी पंधरा जागांवर विजय मिळवित पुन्हा एकदा बाजार समितीची सत्ता राखली आहे. महाविकास आघाडीला फक्त दोन जागा मिळाल्याने त्यांचा धुव्वा उडाला.(Suhas kande bagged 15 out of 18 seats in Nandgaon APMC)

या निवडणुकीत (APMC election) शेवटच्या क्षणी माजी पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी भाग घेत विखुरलेल्या महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) संघटीत केले. आमदार कांदे (Suhas Kande) यांनी मात्र अतिशय नियोजनपुर्वक व साम-दाम नितीचा वापर करीत सत्ता खेचुन आणली.

Suhas Kande
Malegaon APMC News : पालकमंत्री दादा भुसे यांच्या पराभवामागे शिंदे गट?

आपले वर्चस्व प्रस्थापित करताना पाच माजी आमदारांच्या आव्हानाला त्यांनी हादरा दिला. विरोधी गटाचे मविप्रचे संचालक अमित पाटील व माजी आमदार अँड. अनिल आहेर यांचे पुत्र दर्शन आहेर हे महाआघाडीचे उमेदवार विजयी झाले. हमाल मापारी गटातून अपक्ष असलेल्या नीलेश इप्पर यांनी सलग वीस वर्षे संचालक राहिलेल्या आमदार कांदे गटाचे भास्कर कासार यांचा पराभव केला.

सात वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीतही कांदे-कवडे गटाला पंधरा जागा मिळाल्या होत्या. यंदाही त्याच निकालाची पुनरावृत्ती झाली, मात्र तशी होताना माजी सभापती विलास आहेर यांचा झालेला पराभव आमदार गटाला जिव्हारी लागणारा ठरला. त्यांना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे कट्टर समर्थक व ‘मविप्र’चे संचालक अमित पाटील यांनी बावीस मतांनी पराभूत केले.

Suhas Kande
Shivsena rebel : ठाकरेंना सोडलेल्या आमदार चिमणराव पाटील यांना मतदारांचा दणका!

येथील नव्या मध्यवर्ती प्रशासकीय संकुलातील इमारत तीनमधील सभागृहात सांयकाळी पाचला मतमोजणीला प्रारंभ झाला. मतमोजणीसाठी एकूण सहा टेबल मांडण्यात आले होते. माजी आमदार ॲड. आहेर यांचे पुत्र दर्शन आहेर यांच्या राजकीय कारकीर्दीचा या निवडणुकीतून श्रीगणेशा झाला. व्यापारी गटात दोन जागांसाठी अटीतटीची तिरंगी लढत झाली, त्यात आमदार सुहास कांदे यांचेच समर्थक असलेल्या अमोल नावंदर व गोकुळ कोठारी यांच्यात अटीतटीचा सामना रंगला. दोघांनाही समसमान मते मिळाली, मात्र नावंदर हे चिट्ठीवर विजयी झाले. समाधान पाटील, कैलास पाटील, जीवन गरुड या नव्या चेहऱ्याचा आमदार गटाकडून प्रथमच बाजार समितीत प्रवेश झाला. मंगला काकळीज, अलका कवडे या महिला संचालकांचा पुन्हा एकदा प्रवेश झाला.

Suhas Kande
Nashik APMC : देविदास पिंगळे यांची शिवाजी चुंभळेंवर दणदणीत मात!

विजयी उमेदवार...

आमदार कांदे गट : ग्रामपंचायत गटः अनिल वाघ (२७६), अर्जुन पाटील (३०७), दीपक मोरे (३०९), अनिल सोनवणे (३२१). सोसायटी महिला गट : मंगला काकळीज (३५६), अलका कवडे (३५८). विमुक्त जाती भटक्या जमाती : पोपट सानप (३३३). सोसायटी सर्वसाधारण : एकनाथ सदगीर(३०२), कैलास पाटील (३१८), समाधान पाटील (३२०), साहेबराव पगार (२९२), जीवन गरुड (२९१), सतीश बोरसे (३०४), व्यापारी गट: यज्ञेश कलंत्री (२२०), अमोल नावंदर (१९५).

परिवर्तन पॅनल : दर्शन आहेर (२९८), अमित पाटील (३०८).

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com