Satyajeet Tambe; सत्यजित तांबेंचा प्रचार काँग्रेस नेत्यांना भोवणार?

जळगावातील मेळाव्यात डॉ. केतकी पाटलांची, तर फैजपूरात धनजंय चौधरी यांनी हजेरी लावली
Dr Ketki Patil in Tambes campaign
Dr Ketki Patil in Tambes campaignSarkarnama

जळगाव : (Jalgaon) महाविकास आघाडीच्या (Mahavikas Front) उमेदवार शुंभागी पाटील (Shubhangi Patil) यांचा प्रचार करण्याचे आम्हाला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचे आदेश आहेत. त्याबाबत आपण सर्व पदाधिकाऱ्यांना माहिती दिली आहे. त्यानंतरही कोणी तांबे यांच्या व्यासपीठावर जाऊन प्रचार करीत असेल, तर संबंधितांकडून माहिती घेऊन आपण त्याचा अहवाल वरिष्ठांना देऊन कारवाईची शिफारस करणार आहोत, अशी माहिती कॉंग्रेसचे (Congress) जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार (Pradeep Pawar) यांनी दिली. (Congress district president will send a report of rebel workers)

Dr Ketki Patil in Tambes campaign
Mahadev Jankar : ...तर मी डॉक्टर झालो असतो; महादेव जानकरांनी सांगितला किस्सा अन् उपस्थित झाले अचंबित

नाशिक पदवीधर मतदारसंघातून सत्यजित तांबे अपक्ष निवडणूक लढवीत आहेत. पक्षाने त्यांना निलंबित केले आहे. मात्र त्यांच्या प्रचारात विविध काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच नेत्यांची मुले हजेरी लावत असल्याचे चित्र आहे. त्याबाबत तक्रारी सुरु झाल्याने काँग्रेसच्या या नेत्यांना तांबे यांचा प्रचार महागात पडण्याची शक्यता आहे.

Dr Ketki Patil in Tambes campaign
Crime News : राजकीय पक्षाची पदाधिकारी असल्याचे भासवत खंडणी मागणारी महिला पोलिसांच्या जाळ्यात

काँग्रेसने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला असताना, काँग्रेस नेत्यांची मुले मात्र तांबे यांच्या प्रचारात उघडपणे दिसत आहेत. फैजपूर येथील मेळाव्यात कॉंग्रेसचे आमदार शिरीष चौधरी यांचे पुत्र धनंजय चौधरी उपस्थित होते, तर जळगावचे माजी खासदार व काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांच्या कन्या डॉ. केतकी पाटील यांची जळगावातील मेळाव्यात उपस्थिती दिसून आली. त्यामुळे जिल्ह्यातील राजकारणात पुन्हा नवीन तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

नाशिक पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर करून ‘एबी’ फॉर्म दिला होता. मात्र, त्यांनी उमेदवारी अर्ज न भरता त्यांचे चिरंजीव सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर त्यांनी आपण पाठिंबा देण्यासाठी भाजपकडे जाऊ, असे जाहीर सांगितले. नंतर काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे व सत्यजित तांबे यांचे पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबन केले व महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर केला.

माजी खासदारांची कन्या तांबेंच्या प्रचारात

सत्यजित तांबे यांनी गुरुवारी (ता. २६) जळगावच्या लेवा भवनात प्रचार मेळावा घेतला. त्यावेळी काँग्रेसचे उपाध्यक्ष व माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या कन्या व्यासपीठावर होत्या. त्यामुळे अनेकांना आश्‍चर्य वाटले.

कॉंग्रेस नेत्यांशी चर्चा : संजय सावंत

शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले, की तांबे कॉंग्रेसमध्ये अधिक काळ असल्यामुळे त्यांचे कॉंग्रेस नेत्यांशी संबंध आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबत काय कारवाई करायची हा निर्णय त्या पक्षाचा आहे. मात्र, याबाबत कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षांशी चर्चा करणार आहोत. महाविकास आघाडीच्या उमेदवार शुंभागी पाटील यांना विजयी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावयाचे आहेत. त्या विजयी होतील, याची खात्री आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com