Uddhav Thackeray Rajya Sabha Signal : विधान परिषदेसाठी खेचाखेची, पुढे राज्यसभेचं मैदान; थोरातांचा शिवसेना ठाकरे पक्षाला सूचक इशारा

Congress leader Balasaheb Thorat hints at future Rajya Sabha equation while commenting on MVA Legislative Council seat and Uddhav Thackeray in Nashik : विधान परिषदेच्या एका जागेवरून मविआतील शिवसेना ठाकरे पक्ष अन् काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या ओढाताणीवर, बाळासाहेब थोरात यांनी सूचक इशारा दिला आहे.
Uddhav Thackeray Rajya Sabha Signal
Uddhav Thackeray Rajya Sabha SignalSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Legislative Council news : राज्यातील विधान परिषदेच्या दहा जागांसाठी मतदान होत आहे. या मविआच्या वाट्याला एक जागा येते. पण या जागेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाबरोबरच काँग्रेसने दावा केला आहे.

शिवसेना ठाकरे पक्षाकडून या जागेसाठी वेगवेगळी नावे समोर येत असतानाच, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेनंतर, येऊ घातलेल्या राज्य सभेच्या निवडणुकीची सूचक अशी आठवण करून दिली.

काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे नाशिक दौऱ्यावर होते. तिथं त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विधान परिषद निवडणुकीवर भाष्य केलं. ही जागा शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पक्षाकडून इतर कोणी लढत असेल, तर आमच्याशी चर्चा करावीच लागले, असे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले. थोरात यांच्या या भूमिकेवरून या जागेबाबत काँग्रेस प्रचंड आक्रमक असल्याचे संकेत मिळत आहे.

बाळासाहेब थोरात म्हणाले, "विधान परिषदेसाठी आमच्याजवळ, मविआकडे (MVA) एकच जागा आहे. या जागेसाठी अनेकांच्या नावांची चर्चा खूप होत आहे. प्रदेशाध्यक्षांनी या जागेबाबत स्पष्ट सांगितलं आहे की, उद्धव ठाकरे स्वतः असतील, तर आमची काही हरकत नाही."

Uddhav Thackeray Rajya Sabha Signal
Maharashtra Legislative Council election : विधान परिषदेसाठी काँग्रेसमध्ये ‘हाफ डझन’ स्पर्धा; सपकाळ दिल्लीत तळ ठोकून! थोरात-सावंतांसह 6 दिग्गज रिंगणात?

'उद्धव ठाकरे आमचे मुख्यमंत्री राहिले आहेत, आमच्या आघाडीतील ते प्रमुख नेते आहेत. स्वतः त्यांची इच्छा असेल, तर आमचे काहीच म्हणणे नाही. त्यांची इच्छा नसेल, तर चर्चा होऊ शकते. कारण पुढे पुन्हा एकदा एक राज्यसभेची जागा येणार आहे,' असे थोरात यांनी सांगितले.

Uddhav Thackeray Rajya Sabha Signal
Rajya Sabha Election : "मुंबईला निघालोय, जयंतरावांना भेटतोय", बाळासाहेब थोरातांचे 'सरकारनामा'शी बोलताना सूचक संकेत; राज्यसभेसाठी 'मातोश्री' ते 'यशोधन' हालचाली!

आमदारकी नाही, तर खासदारकीसाठी इच्छुक आहात का? यावर थोरात म्हणाले, 'मी राजकारणी आहे. मला काही महत्त्वकांक्षा असणारच आहेत.' परंतु आमच्या जवळ अनेक तरुण आहेत की, ते विधान परिषदेसाठी चांगल काम करतील. जरूर त्यांना संधी देऊ, असेही थोरात यांनी म्हटलं.

अंबादास दानवे यांचे मविआकडून नाव चर्चेत आहे, यावर बाळासाहेब थारोत यांनी पुन्हा उद्धव ठाकरे स्वतः असतील, तर आमचे काहीच म्हणणे नाही. पण ते नसतील, तर त्यांना आमच्याबरोबर चर्चा करावीच लागले, असे ठासून सांगितले.

बाळासाहेब थोरात यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीवर काँग्रेसची भूमिका मांडली आहे. यावरून या जागेसाठी काँग्रेस प्रचंड आक्रमक आहे, असे दिसते आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यासाठी काँग्रेसच्या दिल्ली हायकमांड यांच्याशी देखील संपर्कात आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com