Chhagan Bhujbal: अंधेरी पूर्वची निवडणूक उद्धव ठाकरेंची शिवसेना सहज जिंकेल!

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले, शिवसेनेविषयी काहीही टिका होत असली तरी त्यात आश्‍चर्य वाटत नाही.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

नाशिक: विधानसभेच्या अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या (Andheri East constituency) निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena Uddhav Thackray) या पक्षाला यश शक्य आहे, असा दावा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केला. तसेच श्री. ठाकरे यांच्या (Balasaheb Thackray) उमेदवाराला काँग्रेसने (Congress) पाठिंबा जाहीर केला असून राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) सोबत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. (Chhagan Bhujbal claims there is no suprise in criticism on Shivsena at this stage)

Chhagan Bhujbal
पालकमंत्री दादा भुसेंनी राष्ट्रवादीच्या आमदारांची केली आर्थिक कोंडी!

श्री. भुजबळ हणले, सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावरविविध निकाल, केंद्र शासनातील यंत्रणा आणि बंडखोर चाळीस आमदार ज्या प्रकारे टिकेची झोड उठवत आहे, ते लोकांना पसंत पडलेले नाही. नजीकच्या काळात अंधेरीच्या पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा उमेदवार नाही. त्यांनी भारतीय जनता पक्षाला पाठींबा दिलेला आहे. असे असतना त्यांनी घाईत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पक्षाच्या चिन्हाबाबत हरकत घेणे, सतत न्यायालयीन दावेप्रतिदावे करणे हे लोकांना आवडलेले दिसत नाही. विशेषतः त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आवाहन आहे. अशा स्थितीत कार्यकर्ते आक्रमक होतील. त्याचा शिवसेना विरोधकांना मोठा फटका बसेल.

Chhagan Bhujbal
जिल्हा बँकेत शेतकऱ्यांच्या जमिनी लाटण्याचा धंदा!

अंधेरी पूर्व निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने श्री. ठाकरे यांच्या पक्षाला ‘मशाल' हे निवडणूक चिन्ह दिले. ‘मशाल' या निवडणूक चिन्हावर १९८५ मध्ये पहिल्यांदा माझगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवल्यासंबंधीच्या आठवणींना श्री. भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधताना आज उजाळा दिला. मुंबईचे महापौर आणि आमदार व पुढे महापौर परिषदेचे अध्यक्षपद या आठवणी सांगत असताना श्री. भुजबळ यांनी अभिनेते दादा कोंडके यांच्यासमवेत राज्यभर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या केलेल्या विस्ताराची माहिती सांगत ‘ते मंतरलेले दिवस होते‘, अशा शब्दांमध्ये प्रतिक्रिया व्यक्त केली.

शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या युतीसंबंधीची आठवण श्री. भुजबळ यांनी सांगितली. ते म्हणाले, की प्रांतवादी पक्ष म्हणून शिवसेनेसमवेत युती करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या मुंबईतील तत्कालिन नेत्यांचा विरोध होता. मात्र स्वर्गीय पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी मुंबईत झालेल्या पक्षाच्या अधिवेशनासाठी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना निमंत्रित केले होते. त्यावेळी बाळासाहेबांसमवेत असलेल्या मोजक्या जणांमध्ये आपण होतो. इथे युती होण्याला बळ मिळाले. त्यानंतर राज्यातील सत्तेत २०१४ मध्ये असताना भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आताच्या शिवसेनेतील काही नेते बोलत होते. त्यामुळे शिवसेनेविषयी आता कुणी काहीही म्हणत असले, तरीही त्यात मला फारसे आश्‍चर्य वाटत नाही.

....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com