Dr Atmaram Kumbharde: भाजप नेते आत्माराम कुंभार्डे यांनी घातले काँग्रेसचे टी-शर्ट, म्हणाले, कोतवाल माझे गुरु!

Maharashtra Political News : चांदवड विधानसभा मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांचे सुरू झाले कुरघोडीचे राजकारण.
Dr Atmaram Kumbharde BJP
Dr Atmaram Kumbharde BJPSarkarnama
Published on
Updated on

Congress Vs BJP: राजकारणात काँग्रेस आणि भाजप परस्परांचे राजकीय प्रतिस्पर्धी आहेत. मात्र नेते प्रतिस्पर्धी मानतीलच असे नाही. चांदवड येथे झालेल्या काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष माजी आमदार शिरीष कोतवाल यांच्या वाढदिवसात भाजप नेते डॉ. आत्माराम कुंभार्डे यांच्याबाबत घडलेला प्रसंग त्यामुळेच चर्चेचा विषय आहे.

काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आणि चांदवड देवळा विधानसभेचे संभाव्य उमेदवार माजी आमदार शिरीष कोतवाल यांचा वाढदिवस नुकताच झाला. त्याला भाजप नेते डॉ आत्माराम कुंभार्डे यांनी मित्र म्हणून हजेरी लावली. यावेळी त्यांनी सध्या ट्रेंड असलेले काँग्रेसच्या चिन्हाचे टी-शर्ट परिधान केले.

त्यामुळे हा कार्यक्रम आणि डॉ कुंभार्डे चांगलेच चर्चेत आले आहेत. त्याला कारण म्हणजे डॉ कुंभार्डे हे देखील भाजपकडे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. पक्षाकडे त्यांनीही उमेदवारी मागितली आहे. चांदवड-देवळा मतदारसंघात सध्या डॉ. राहुल आहेर हे विद्यमान आमदार आहेत.

काँग्रेसने नेते कोतवाल यांच्या वाढदिवसाला दोन प्रमुख प्रतिस्पर्धी पक्षांचे संभाव्य उमेदवार एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार उपस्थित होते. काँग्रेस नेत्यांच्या या मांदियाळीमुळे कुंभार्डे यांच्या उपस्थितीची चर्चा तर होणारच.

Dr Atmaram Kumbharde BJP
Girish Mahajan Politics: मंगेश चव्हाण यांना पाठबळ देत गिरीश महाजन टिपणार एका गोळीत तीन सावज!

या राजकीय चर्चेच्या पार्श्वभूमीवर डॉ कुंभार्डे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, शिरीष कोतवाल माझे राजकीय गुरू आहेत. त्यामुळे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे यात काहीही वावगे वाटत नाही. मी घातलेले टी-शर्ट वर काँग्रेसचे चिन्ह आहे, याची मला कल्पना नव्हती. काँग्रेसचे चिन्ह असल्याचे लक्षात आल्यावर मी ते काढून ठेवले.

त्यांनी एक सूचक वक्तव्य देखील केले. ते म्हणाले. मी भाजपकडे उमेदवारी मागितली आहे. गेली दोन टर्म येथे देवळा तालुक्याचे प्रतिनिधित्व आहे. त्यामुळे यंदा चांदवडला संधी मिळाली पाहिजे अशी माझी भूमिका आहे. हा भाजपच्या विद्यमान आमदारांना थेट ईशारा आहे, हे राजकीय कार्यकर्त्यांना वेगळे सांगण्याची गरज नाही.

या मतदारसंघात २०१४ मध्ये डॉ कुंभार यांनी अपक्ष उमेदवारी केली होती. त्याचा फटका चांदवडचे काँग्रेस उमेदवार कोतवाल यांना बसला. मत विभागणीमुळे भाजपचे डॉ आहेर विजयी झाले. यंदाच्या निवडणुकीत काय होईल, याची उत्सुकता आहे.

Dr Atmaram Kumbharde BJP
Narhari Zirwal : अजितदादा की पवारसाहेब, नरहरी झिरवाळ यांनी स्पष्टच सांगितले

तेव्हापासून या मतदारसंघात सतत देवळा आणि कळवण अशी भावनिक विभागणी आहे. यंदा चांदवडचे सर्व नेते पुन्हा एकदा एकवटले आहेत. महाविकास आघाडीच्या लोकसभा निवडणुकीतील विजय यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.

या उलट भाजपचे आमदार डॉ आहेर यांच्या विरोधात उमेदवारीसाठी त्यांच्याच पक्षातील अनेकांनी देव पाण्यात घातले आहे. त्यामुळे काँग्रेस नेते माजी आमदार कोतवाल यांचा वाढदिवस आणि त्याला कुंभार्डे यांची हजेरी काही वेगळे राजकीय संकेत तर देत नाही ना? अशी चर्चा झाल्यास नवल नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com