Congress Politics : काँग्रेसच्या निष्क्रीय पदाधिकाऱ्यांना दाखवणार घरचा रस्ता

Party office bearers will be reviewed in Nashik : जिल्हा अध्यक्ष शिरीष कोतवाल प्रत्येक पदाधिकाऱ्याच्या कामकाजाचा घेणार आढावा.आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला काँग्रेसने प्राधान्य दिले आहे. यासंदर्भात प्रत्येक तालुक्यातील पदाधिकाऱ्याच्या कामकाजाची माहिती घेऊन कारवाई केली जाणार आहे.
shirish kotwa
shirish kotwaSarkarnama
Published on
Updated on

Shirish Kotwal News : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला काँग्रेसने प्राधान्य दिले आहे. यासंदर्भात प्रत्येक तालुक्यातील पदाधिकाऱ्याच्या कामकाजाची माहिती घेऊन कारवाई केली जाणार आहे. काँग्रेसने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी बैठक होत आहेत. मात्र अद्यापही अनेक मतदारसंघात पदाधिकारी निष्क्रीय आहेत. संघटनात्मक कामकाज प्रभावी नाही, असे चित्र आहे.

काँग्रेसमधील (Congress) या विसंवादाचा त्याचा फटका निवडणुकीत बसण्याची भीती आहे. त्यावर उपाययोजना करण्याचे काम जिल्हाध्यक्ष माजी आमदार शिरीष कोतवाल यांनी सुरू केले आहे. या संदर्भात जिल्ह्यातील प्रत्येक तालुका अध्यक्षांची बैठक घेऊन त्यांचे प्रगती पुस्तक तपासले जाणार आहे.

पक्षासाठी वेळ देणाऱ्या आणि चांगले काम करणाऱ्यांनाच पदावर ठेवण्यात येईल. जे पदाधिकारी निष्क्रिय आहेत, अशा लोकांना घरचा रस्ता दाखवण्याची तयारी पक्षाने केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी जिल्हा पदाधिकार्‍यांची बैठक गुरूवारी झाली. या बैठकीला अपेक्षित उपस्थिती नव्हती. अनेक पदाधिकार्‍यांनी या बैठकीला दांडी मारल्याचे बोलले जाते.

shirish kotwa
Sharad Pawar Vs Ajit Pawar : शरद पवार अजित पवार यांना मोठा धक्का देणार? नाशिकमध्ये मोठी घडामोड

विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhan Sabha Election) प्रत्येक मतदारसंघातून इच्छुकांचे अर्ज मागविण्यात येणार आहेत. यातील काही मतदारसंघांमधून उमेदवारीसाठी इच्छुकच नाहीत अशी स्थिती आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये काँग्रेस विषयी अपेक्षा वाढल्या आहेत. या संदर्भात पदाधिकार्‍यांनी लोकांमध्ये जाऊन काम केले पाहिजे. लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सरकार विरोधात संघर्ष केला पाहिजे. पदाधिकारी सक्रिय राहिले तरच जनमानसात आणि पक्षात स्थान मिळेल. त्यामुळे प्रत्येक पदाधिकार्‍याने निवडणुकीच्या तयारीला लागावे. महाविकास आघाडीच्या पदाधिकार्‍यांशी समन्वय ठेवून काम करावे, असे आवाहन यावेळी माजी आमदार कोतवाल यांनी केले.

shirish kotwa
Rajabhau Waje News : नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्पासाठी खासदार वाजे 'Action Mode'वर!

नाशिक जिल्ह्यात 15 विधानसभा मतदारसंघ आहेत. सध्या फक्त इगतपुरी मतदारसंघात काँग्रेसचे आमदार आहेत. गेल्या निवडणुकीत मालेगाव मध्य, चांदवड या मतदारसंघात पक्षाचा पराभव झाला होता. या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकीत किमान सात जागांची मागणी करण्यात येणार आहे. मात्र त्यावर विसंबून न राहता सर्व 15 मतदारसंघांमध्ये इच्छुक उमेदवारांचा शोध घेतला जाणार आहे. त्यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करायचे आहेत.

पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील उमेदवारीसाठी अर्ज करावेत. या संदर्भात पक्षाला निधी उपलब्ध होऊ शकेल. वरिष्ठ नेत्यांच्या आदेशामुळे येत्या निवडणुकीत जागा वाटपासाठी जिल्हास्तरावरून मतदारसंघ आणि उमेदवारांच्या नावांची शिफारस करण्यात येईल. त्यामुळे निष्क्रिय पदाधिकाऱ्यांनी मरगळ झटकून कामाला लागावे. अन्यथा त्याचा फटका पक्षाला बसेल असा इशारा या बैठकीत देण्यात आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com