Kunal Patil News : भारतीय जनता पक्षाच्या घृणास्पद आणि लोकशाहीविरोधी राजकारणाचा जनतेला अक्षरशः उबग आला आहे. असे प्रकार राज्यातील सुसंस्कृत जनतेला मान्य नाही. त्यामुळे येत्या निवडणुकीत केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता जाणे अटळ आहे, असा विश्वास काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांनी व्यक्त केला. (MLA Kunal Patil claimed, BJP will loose in centre as well in state is confirmed)
शिंदखेडा (धुळे) (Dhule) परिसरात आमदार कुणाल पाटील (Kunal Patil) यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसतर्फे (Congress) जनसंवाद यात्रा काढण्यात आली. त्याचे नागरिकांनी उत्साहात स्वागत केले. यावेळी पाटील यांनी भाजपवर (BJP) टिका केली.
काँग्रेसची जनसंवाद पदयात्रा आणि राष्ट्रीय नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे विरोधक हादरले आहेत. त्यात जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता देशासह राज्यात परिवर्तन अटळ असल्याचा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला.
जिल्ह्यात आमदार पाटील यांच्या नेतृत्वात सोमवारी काँग्रेस जनसंवाद पदयात्रेला साळवे- चिमठाणे येथील क्रांतीस्मारकापासून सुरुवात झाली. गावागावांतील पदयात्रेत आमदार पाटील आणि सहकाऱ्यांनी शेतकरी, शेतमजूर, हातगाडी विक्रेत्यांशी संवाद साधला. खलाणेसह शिंदखेडा येथे सभा झाली.
आमदार पाटील म्हणाले, की देशात सरकारच्या दडपशाहीमुळे भित्तीचे वातावरण आहे. वाढती महागाई, महिलांवर अत्याचार, शेतीमालास भाव नाही, जातीय तेढ निर्माण करणे, विरोधकांचा आवाज दाबून लोकशाही- संविधान संपविण्याचे कटकारस्थान आदींमुळे जनतेच्या मनात सत्ताधाऱ्यांविषयी चीड आहे. जनतेच्या मनातील भिती दूर होण्यासाठी पक्षातर्फे राज्यव्यापी जनसंवाद पदयात्रा सुरू झाली.
जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, ज्येष्ठ सुरेश देसले, प्रफुल्ल शिसोदे, सुनील चौधरी, माजी नगरसेवक दीपक अहिरे, दीपक देसले, बाजार समिती सभापती बाजीराव पाटील, महिला जिल्हाध्यक्ष गायत्री जयस्वाल, शिंदखेडा तालुका महिलाध्यक्षा छाया पवार, शामकांत पाटील, पंचायत समिती सदस्य राजेंद्र देवरे, सदस्या सुरेखा बडगुजर, इंटकचे जिल्हाध्यक्ष प्रमोद शिसोदेआदींसह कार्यकर्ते सहभागी झाले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.