Dhule, 1 June : धुळे लोकसभा मतदारसंघात यंदा काँग्रेस विरुद्ध भाजप अशी निकराची लढाई झाली. मात्र मतदारांनी ही निवडणूक हाती घेतली होती. त्यामुळे धुळ्यातून काँग्रेसचा विजय नक्की आहे, असा दावा धुळ्याच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांनी केला आहे.
धुळे मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे तिसऱ्यांदा उमेदवारी करीत होते. त्यांना काँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव यांनी आव्हान दिले. या निवडणुकीत मतदारांनी काँग्रेसच्या विचारसरणीला साथ दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे द्वेषाचे राजकारण नाकारले. त्यामुळे यंदा काँग्रेस निश्चितच विजयोत्सव साजरा करील, असा विश्वास काँग्रेसच्या उमेदवार डॉ बच्छाव यांनी व्यक्त केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
त्या म्हणाल्या, धुळे मतदारसंघात यंदा अल्पसंख्याक आणि मुस्लिम मतदारांवर केंद्रातील सरकारकडून भेदभाव केल्याचा तीव्र संताप होता यंदा भाजपला ४०० जागा मिळाल्यास ते नक्कीच देशाची राज्यघटना बदलतील, अशी भीती सामान्य मतदारांमध्ये होती. या मतदारसंघात गेल्या दहा वर्षात खासदार काहीही करू शकलेले नाहीत. अँटी इन्कमबन्सी दिसत होती. दहा वर्षे खासदार असलेले डॉ. भामरे वैद्यकीय क्षेत्रातले आहेत. मात्र हिरे रुग्णालयातील बंद पडलेले एमआरआय मशीन ते सुरू करू शकले नाहीत. हा त्यांच्या कारभाराचा ढळढळीत पुरावा आहे.
भाजप सरकारने जाणीवपूर्वक शेतकऱ्यांवर अन्याय केला. कांदा निर्यात बंदी आणि शेतीमालाला भाव नाही, हे प्रश्न तीव्रतेने पुढे आले. शेतकऱ्यांचा भाजप सरकारवरचा विश्वास पूर्णतः उडालेला आहे. यामुळे यंदा भाजपचा पराभव नक्की आहे, असा दावाही बच्छाव यांनी केला आहे.
धुळे मतदारसंघात अनेक स्थानिक प्रश्न आहेत, ते सुटलेले नाहीत. धुळे शहराला अद्यापही नियमित पाण्याचा पुरवठा होत नाही. नागरिकांना आठ ते दहा दिवसांनी पिण्याचे पाणी मिळते. हा किती गंभीर प्रश्न आहे. मात्र सर्व पदांवर भाजप असूनही ते हा प्रश्न का सोडवू शकले नाहीत, असा सगळ्यांचा प्रश्न आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.