Sanjog Waghere Vs Srirang Barne : बारणे, वाघेरेंचे लाखाच्या मताधिक्यांचे दावे फोल ठरणार; घाटाखालचे मतदान ठरणार निर्णायक!

मतदानानंतर आठ दिवसांनी (21 मे) बारणेंनी पिंपरी-चिंचवडमधील थेरगाव येथील आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अडीच लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने विजयी होण्याचा दावा केला आहे. त्याअगोदर वाघेरेंनी आपण पावणेदोन लाखाच्या लीडने विजयी होऊ, असा दावा केला होता. मात्र, हे दोन्ही दावे खरे ठरण्याची शक्यता नाही.

Sanjog Waghere Patil-Srirang Barne
Sanjog Waghere Patil-Srirang BarneSakarnama
Published on
Updated on

Pimpri, 1 June : मावळ लोकसभेची गेल्यावेळची (२०१९) निवडणूक ही एकतर्फी होऊन शिवसेनेचे श्रीरंग बारणे (Srirang Barne) हे २ लाख १५ हजारांच्या लीडने निवडून आले होते. या वेळी मात्र मावळात अटीतटीची लढत झाली आहे, त्यामुळे महायुती (बारणे) आणि महाविकास आघाडीच्या (संजोग वाघेरे-पाटील Sanjog Waghere-Patil ) प्रमुख उमेदवारांनी केलेले लाखाच्या मताधिक्याचे दावे फोल ठरण्याची दाट शक्यता आहे.

मतदानाच्या चौथ्या टप्यात १३ मे रोजी मावळमध्ये (Maval) ५५ टक्के मतदान झाले. गतवेळपेक्षा ते ५ टक्याने कमी झाले आहे. त्यामुळे विजयी होण्याची शक्यता असलेल्या दोन्ही प्रमुख उमेदवारांनी केलेले लाखाच्या लीडचे दावे फोल ठरणार आहेत. मतदानानंतर आठ दिवसांनी (२१ मे) बारणेंनी पिंपरी-चिंचवडमधील थेरगाव येथील आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अडीच लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने विजयी होण्याचा दावा केला आहे. त्याअगोदर वाघेरेंनी विधानसभा मतदारसंघनिहाय झालेल्या मतदानाच्या आधारे आपण पावणेदोन लाखाच्या लीडने विजयी होऊ, असा दावा केला होता. मात्र, हे दोन्ही दावे खरे ठरण्याची शक्यता नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)


Sanjog Waghere Patil-Srirang Barne
Nashik Teacher Constituency : काँग्रेसचा बडा नेता ठाकरेंच्या गळाला, नाशिक शिक्षक मतदारसंघातून गुळवे मैदानात उतरणार?

मावळमधील लढत ही या वेळी घासून झाली. ती गेल्या वेळेसारखी एकतर्फी झाली नाही, त्यामुळे तेथील विजयी होणारा उमेदवार हा यावेळी लाखाच्या आतील लीडनेच निवडून येणार आहे. या वेळी ही निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थेसारखी नात्यागोत्याची आणि गावकीभावकीची झाली आहे.

वाघेरे आणि बारणे दोघेही मराठा असल्याने मराठा आरक्षण आंदोलन आणि प्रश्नाचा अजिबात प्रभाव तेथे जाणवला नाही. उलट पुन्हा घाटावरच्या आणि पिंपरी-चिंचवडकर उमेदवारांमध्ये ही लढाई झाली. पर्यायाने पिंपरी, चिंचवड, मावळ या घाटावरील तीनही विधानसभा मतदारसंघात या दोघांनाही मतदान झाले. त्यामुळे घाटाखालील पनवेल, कर्जत आणि उरणमधून कोण किती लीड घेणार, यावरच घाटावरील या दोन्ही उमेदवारांचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

मंगळवारी दुपारी एकपर्यंत कळणार मावळचा खासदार

मतदानाचा अखेरचा सातवा टप्पा (१ जून) झाल्यानंतर ४ जूनला सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरु होईल. मावळची मतमोजणी बालेवाडी येथील क्रीडा संकुलात होणार आहे. ती विनाअडथळा झाली, तर मावळचा नवा खासदार कोण हे दुपारी एकलाच स्पष्ट होणार आहे, असे मावळ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले. तीन, साडेतीन वाजता मतमोजणीच्या सर्व २५ फेऱ्या होऊन निकाल हाती येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.


Sanjog Waghere Patil-Srirang Barne
Shashikant Shinde : 'महाविकास आघाडी महाराष्ट्रात 30 ते 35 जागा जिंकेल', शिंदेंना ठाम विश्वास

वाघेरेंचे वजन दहा किलोंने घटले

वाघेरे यांची ही लोकसभा लढण्याची पहिलीच वेळ, त्यामुळे घाटावर आणि घाटाखाली असा पुणे आणि रायगड जिल्ह्यात निम्मा-निम्मा विभागलेल्या मावळ या मोठ्या मतदारसंघात प्रचार करताना त्यांची दमछाक झाली. त्यात त्यांची उमेदवारी ही बारणेंअगोदर जाहीर झाल्याने ते अगोदरच कामाला लागले होते.

नवा चेहरा आणि नवे निवडणूक चिन्ह असल्याने त्यांचा अधिकाधिक मतदारांपर्यंत जाण्याचा प्रयत्न होता, त्यामुळे त्यांची मोठी दमछाक झाली. परिणामी मतदान झाले त्य़ादिवशी सायंकाळी त्यांचे वजन दहा किलोने कमी झाल्याचे दिसले, असे त्यांचे बॅक ऑफिस सांभाळणारे शांताराम वाघेरे यांनी सांगितले. दरम्यान, मतदानानंतर ते कुठेही बाहेर फिरायला गेले नाहीत.

बारणेंची तुलनने कमी दमछाक

बारणेंची ही तिसरी निवडणूक. अगोदरच्या दोन्ही निवडणुकीतील प्रचार आणि विजयाचा अनुभव गाठीशी असल्याने त्यांची प्रचार करताना या वेळी तुलनेने कमी दमछाक झाली. तसेच त्यांचा पक्ष राज्य व केंद्रातही सत्तेत असल्याचा मोठा फायदा त्यांना प्रचारात झाला, त्यामुळे मतदान झाल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधून ते सहकुटुंब मध्य प्रदेशात ट्रीपला जाऊन आले. त्याला त्यांचे बॅक ऑफीस सांभाळणारे रवींद्र नामदे यांनी दुजोरा दिला.

Edited By : Vijay Dudhale


Sanjog Waghere Patil-Srirang Barne
Vijaykumar Deshmukh : देवेंद्र फडणवीसांना दिलेला मताधिक्क्याचा शब्द विजयकुमार देशमुख खरा करून दाखवणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com